भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्याचे माजी खासदार व किसान मोर्चाचे प्रदेश महासचिव शिशुपाल पटले यांनी आज केंद्र सरकार द्वारे २०२४-२५ करिता जाहिर धाना करीता किमान आधारभूत किंमत कमी असल्याचे मत व्यक्त केले. २०२३-२४ च्या खरिप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रती क्विंटल रू २३०० केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला. मागील वर्षी असलेल्या रू.२१८३ वरून रू.११७ ने वाढवून रू.२३०० जाहीर केले. हा धानाचा दर शेतकरी बांधवाना परवडण्यासारखा नसुन राज्य शासनाने १२०० रु. प्रति क्विंटल बोनस जाहिर करावा अश्ी मागणी केली आहे.
धान फसल उत्पादनासाठी शेतकाºयांना अधिक खर्च येतो, त्या तुलनेत आज जाहिर एमएसपी म्हणजे शेतकºयाची थट्टा करण्या सारखी आहे. वर्तमान परिस्तितीमध्ये बियाने, खात, पानी, मजूरी व ट्रॅक्टर किराया आदि खर्च वाढले असुन केंद्र सरकार कडून जाहिर आधारभूत किमत रू. २३०० ही खूब कमी आहे, ही भरपाई भरून काढण्यासाठी यात रू १२०० राज्य शासनाने बोनस म्हणून जाहिर करावा. केंद्र सरकारने जाहीर केलेला एमएसपी रू.२३०० अधिक राज्य सरकारचे बोनस रू. १२०० असे रू. ३५०० एवढी किंमत शेतकºयांच्या धानाला प्रती क्विंटल मिळाली पाहिजे. तरच शेतकºयाला नफा मिळू शकेल. अशी मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केली आहे.