भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर/चौ. मोठी लोकवस्ती असलेल्या गावामध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरू असलेल्या नळ योजनेच्या कामात अधिकारी व कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारामुळे पाईपलाईन लेव्हलिंग आणि कामाच्या दिरंगाईमुळे गावात मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना कृत्रिम पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असून जनतेत शासन प्रशासना विषयी रोष व्यक्त केला जात आहे. तेव्हा विभागीय वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शासनामार्फत मागील एक वर्षांपूर्वी पासून पालांदूरसह अनेक ठिकाणी गावागावांमध्ये निर्माण होणाºया पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, प्रत्येक कुटूंबाला व व्यक्तींना स्वच्छ निर्मळ पिण्याचे पाणी मिळावे याकरिता जलजीवन मिशन नळ योजनेची अंमलबजावणी करून तात्काळ म्हणजे लवकरात लवकर यशस्वीरित्या कार्य पूर्णत्वास यावे याकरिता मुख्य कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कार्यान्वित केलेली आहे.
मात्र येथील काही अभियंता, अधिकारी व कंत्राटदा- राच्या मनमर्जी कारभारामुळे मोठी लोकवस्ती असलेल्या पालांदूरसह अन्य इतर गाव खेड्यातली काही गावांमध्ये सुरू असलेल्या नळ योजनेतील पाईपलाईनचे जाडे पसरविताना नियोजनशून्य कार्यप्रणाली अवलंबिल्यामुळे नळाला पाण्याचा पुरवठा होत नाही. जमिनीचे उतार असलेल्या काही भागांमध्ये पाण्याचा पुरवठा होतो. या नियोजनसुने कार्यप्रणालीत एक दिवसाच्या अंतराने नळाला पाणीसोडले जाते. तरी मात्र नळाच्या पाण्याच्या प्रवाहाला वेग नसल्यामुळे अनेक लोकांना अंगणामध्ये खडे खोदून पाणी मिळविण्यासाठी कुटूंबातील सर्व व्यक्ती पाणी भरण्याच्या कार्यात सहभागी होऊन तारेवरची कसरत करावी लागते आहे. अधिकाºयांच्या मनमर्जी कारभारामुळे व कामाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊन कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. यामुळे अनेक गावातील नागरिक शासनप्रशासन यांच्यावर रोष व्यक्त करीत आहेत. तेव्हा वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन नागरिकांना करावा लागणारा पाणी टंचाईचा सामना संपुष्टात आणण्याच्या कार्यवाहीस प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.