भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज महायुती सरकारच्या विरोधात चिखल फेक आंदोलन करण्यात आले. राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी,कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाºया महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील १० वषार्पासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही. धान, कांदा, यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएमपी देत नाही.
कठिण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे. ठएएळ परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे. महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, वि-वियाणांचा काळाबाजार, कजार्साठी शेतकºयांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याचावत चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत, मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यातील जनता या समस्यांचा सामना करत आहे पण सरकार फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे कमिशन घेणे एवढेच काम करत आहे.
यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मोहन पंचभाई, खासदार डॉ प्रशांत पडोळे, वरिष्ट नेते सफी भाई लद्दानी, सुभाष आजबले, माजी आमदार अनिल भाऊ बावनकर, जि. प. अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, सभापती मदन रामटेके, सभापती स्वाती वाघाये, माजी जिल्हाध्यक्ष सागर गणवीर, महिला काँग्रेस अध्यक्ष सौ जयश्री बोरकर, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन वंजारी, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, राजेश हटवार, उत्तम भागडकर, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, शंकर राऊत, अमर रगडे, गजानन झंजाळ, देवा इलमे, शमिम शेख, आवेश पटेल, धनराज साठवणे, विजय कापसे, सुरेश ब्राह्मणकर, राजकपूर राऊत, शंकर तेलमसरे, मंगेश हुमने, विनीत देशपांडे, संजय सार्वे, मंजुषा चव्हाण, सारिका नागदेवे, विजय शहारे, शीतल राऊत, पूजा हजारे, जगदीश उके, पूजा ठवकर, धनंजय तिरपुडे, विकास राऊत, पंकज उके, महेंद्र वाहणे, म्हबूब खान, नवाब पटेल, व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.