योग दिनात ५०० नागरिकांनी केली योग प्रात्यक्षिके

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित आजच्या जे.एम.पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये साधारणत पाचशेच्यावर नागरिकांनी सहभाग घेऊन योगासनांची सामूहिक प्रात्यक्षिके केली. या योग दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी लीना फलके, प्रा.डॉ.विकास ढोमणे, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे, जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती रत्नाकर तिडके, डॉ.रमेश खोब्रागडे, डॉक्टर भगवान मस्के, वैशाली गिरेपुंजे, डॉ. भीमराव पवार, प्राध्यापक रोमी बीस्ट, रमेश अहिरकर, विलास केजरकर प्रामुख्याने उपस्थित होते .

यावेळी मुख्य पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वृक्षरोपे देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तदनंतर डॉ. रमेश खोब्रागडे, कांचन ठाकरे यांनी योग्य प्रात्यक्षिके करून दाखविली. योगमय वातावरणात ५०० हून अधिक नागरिकांनी सक्रिय योगासने करून सहभाग नोंदवला. यामध्ये ग्रीना चालन स्कंद संचालन स्कंदचक्र कधी चालन घुटना संचालन तारा संरक्षण पादस्तासन अर्धचक्रासन त्रिकोनासन भद्रासन अनुलोम विलोम कपाल भारती भ्रामरी प्राणायाम शीतलीप्राणायाम इत्यादी योग प्राणायाम चा अभ्यास करण्यात आला. यावेळी योगाचे मास्टर ट्रेनर यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपे देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन व आभार प्राध्यापक संग्रामेश्वर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभाग शिक्षण विभाग नेहरु विवाह केंद्र जय.एम पटेल महाविद्यालय पतंजली योग सांस्कृतिक चिकित्सालय लायन्स क्लब जिल्हा योग संघटना संत गुलाब बाबा युवा प्रशिक्षण केंद्र तसेच विविध सामाजिक संघटनांनी संयुक्त प्रयत्न केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *