भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील पारडी येथील आरोग्य केंद्र जिर्णावस्थेत आले असताना इमारतीला जागोजागी भेगा पडल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत बघायला मिळत होते, याकडे आरोग्य यंत्रणेने पार दुर्लक्ष केल्याने गावकºयांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहीवले यांचेकडे यासबंधाने गाºहाने मांडले. या अनुषंगाने दहिवले यांनी शासन दरबारी कागदोपत्री पाठपुरावा करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधून अखेर इमारतीच्या डागडूगीच्या कामासाठी १२ लक्ष रूपयांची प्रशासकीय मंजूरी मिळवून घेतली आणि काही दिवसातच आरोग्य केंद्राच्या डागडूगीच्या कामाला सूरूवात करून जनतेच्या सेवेसाठी खुली करण्यात आली असल्याचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले. यावेळी प्रशासनावर मनस्ताप व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या तडे गेलेल्या भिंती, छताची पडझड, झालेल्या इमारतीसाठी निधीची पुर्तता शासनाने केली. मात्र, ऐन पावसाळ्याच्या दिवसात दवाखान्यात डॉक्टर नसल्याने आयुष्यमान आरोग्य मंदीर अजूनही सूने असल्याचे रूग्णावर उपचार करणार कोण? असा थेट सवाल यावेळी परिसरातील जनतेला पडला आहे.
ग्रामीण जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दुर्गम भागात सुध्दा शासनाने आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केले. मात्र येथे रुग्णांची सेवा चांगल्याप्रकारे होत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक आता खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेवू लागले आहेत. पारडी जंगलव्याप्त व दुर्गम भाग असल्याने तसेच आदिवासी क्षेत्र काही भागात असल्याने शासनाने तेथील नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गावागावात सुदृढ आरोग्याबाबत जनजागृती आणि तपासणी मोहिम राबविण्यासाठी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांवर जबाबदारी सोपविली. मात्र ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रीयतेमुळे खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेत गरिबाचे खिशे रिकामे होत आहेत. यामुळे पारडी केंद्रातील नियमित वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी तसेच परिचर ही रिक्त पदे तात्काळ भरून परिसरातील जनतेला आरोग्य सेवा खुली करावी, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मानबिंदू दहिवले यांनी दिला आहे.