भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा:तुमसर तालुका अंतर्गत असलेल्या बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काल शनिवार २२ जून रोजी जनसंपर्क दौरा केला. या जनसंपर्क दौºयावेळी जनतेने जनसामान्याच्या अनेक समस्यांची माहिती माजी खासदार शिशुपाल पटले यांना दिली. यात नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी मिळालेली नाही, खरीप व रब्बी हंगामातील नुकसान भरपाई शेतकºयांना मिळालेली नाही, धान खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकºयांना आपले धान कमी किमतीत व्यापाºयांना विकावे लागले अशा अनेक समस्या जनसंपर्क दौºयाच्या वेळी निदर्शनास आणून देण्यात आल्या.
या वेळी भाजपा किसान मोचार्चे जिल्हा उपाध्यक्ष किशोर रहांगडाले, जि.प. क्षेत्र प्रमुख गोवर्धन शेंडे, पं.स.सदस्य देवानंद लांजे, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरचे संचालक तथा सरपंच विनोद पटले, सुकळी नकुलच्या सरपंचा सौ.नागपुरे ताई, उपसरपंच सोहन पारधी, देवेंद्र रहांगडाले, टेकेश्वर पटले, संजय राऊत, सुनील शिवणे, बानाजी कटरे, रोशन रहांगडाले, हरिनाथ कोहपरकर, चापालाखे, दुर्दास सदाम, मोनिष राऊत, चंडी पुसाम, चेतन रहांगडाले, सुनील पटले, संदीप जटाले, हिरालाल उपरिकर, संतोष गौतम, बानेवार, राकेश मेश्राम व अनेक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.