भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : टँकरचे बनावट कागदपत्रे, नंबर प्लेट तयार करून तालुक्यातील अर्जुनी येथील पारिजात आॅइल मिलमधून ३२२७ किलोग्रॅम राइस बँड क्रुड आईलची अफरातफर करणाºया आंतरराज्यीय टोळीचा रावणवाडी पोलिसांनी पदार्फाश केला आहे. या प्रकरणात सात आरोपींना ताब्यात घेत २६,११५ किलोग्रॅम राइस बँड क्रुड आॅइल व टँकर असा ५० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी गुरमितसिंग मसासिंग भ्रुर (३६, रा. डिलाराम ता. जि. फिरोजपूर, पंजाब) सध्या रा. पारिजात आॅइल मिल कॅम्पाउंड, अर्जुनी यांनी १९ जानेवारी २०२४ रोजी रावणवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, २८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी तीनच्या सुमारास राहुल टँकर सर्विस रायपूर (छत्तीसगढ) मालक योगेश विमलदेव ठाकूर यांच्याद्वारा पाठविलेला टँकरचालक सुनीलकुमार ब्रह्मानंद मिश्रासोबत आरोपींनी संगणमत केले. त्यानंतर त्यांच्या पारिजात आॅइल मिलमधून २३,७१,८४५ रुपये किमतीचा ३२२७क्विंटल राइस ब्रँड क्रुड आॅइल साल्वेन्ट प्रा. लि. कंपनी मुरैना, मध्य प्रदेश येथे न पोहोचवता अफरातफर केली. दरम्यान, गुरमितसिंग भ्रुर यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने तपास केला. आरोपी गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसानी गुजरातला जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी टँकर क्रमांक जीजे 1१२ एझेड २२९५ या कह्यमांकाची नंबर प्लेट बदलून त्यावर दुसºया कह्यमांकाची नंबर प्लेट लावली. तसेच त्या क्रमांकाचे खोटे कागदपत्रे तयार करून आरोपी चालक महेंद्रकुमार हरगोवनभाई मकवाना याचे सुनीलकुमार ब्रह्मानंद मिश्रा नावाने खोटे ड्रायव्हिंग लायसन्स बनवून गुन्हा करण्याचा कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले. आरोपींच्या ताब्यातून ३० लाख रुपयांचा टँकर जप्त केला. त्यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता आरोपींनी अफरातफर केलेला राइस ब्रँड क्रुड आइल आरोपी मुकेश विठ्ठलभाई चौवाटीया (४७, रा. ११५, शांतीनगर, ता. अंजार, जि. कच्छभुज, गुजरात),मधूभाई भिकाबाई चौवाटीया (६०, रा. जांझर्डा रोड, गोपालधाम सोसायटी, जुनागड, जि. जुनागड गुजरात) यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यांना ताब्यात घेत २० लाख ९० हजार रुपये किमतीचा २६,११५ किलोग्रम राइस ब्रँड क्रुड आइल व टँकर असा ५० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी विविध राज्यात अनेक गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांत कोट्यवधींचे मस्टर्ड आइल, राईचे आइल व राइस ब्रँड क्रुड आॅइलची अफरातफर केली आहे.