नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळेंचा गोंदियात छुपा दौरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पराभूत करून काँग्रेसचे खासदार डा. प्रशांत पडोळे निवडणूक आले होते. त्यानंतर ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशिवाय रविवारी (दि.२३) प्रथमच गोंदियात आले. डा. पडोळे यांनी गोंदियात पहिलाच दौरा छुप्या पध्दतीने केल्याने गोंदिया जिल्हा व शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आपल्या या छुप्या दौºयात खा. प्रशांत पडोळे यांनी गोंदियातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेऊन प्रशासकीय, कायदा सुरक्षा आणि आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच काही खाजगी लोकानाही भेटले. त्यांच्या या दौºयाची गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस प्रदेश सचिव, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसूभर ही माहिती नव्हती. त्यामुळे काँग्रेसच्या या पदाधिकाºयांवर नानाभाऊ हा कसला खासदार दिला. असे म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली. तर काहींनी तसे माध्यमांपुढे बोलूनही दाखविले.

एखादा खासदार किंवा आमदार निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या क्षेत्रात आल्यास त्यांचा जल्लोषात स्वागत केले जाते. त्यानुसार खासदार प्रशांत पडोळे यांचे गोंदिया येथे पहिल्यांदाच आगमन होताच त्यांच्या आगमनाचे जल्लोषात स्वागत सोहळा करण्याची जिल्हा काँग्रेस कमिटी ची तयारी होती. जिल्हयातील जनतेचे आभार मानण्यासाठी यात्रा काढायचे यांचे मानस होते, मात्र तसे काहीही करण्याची संधी नवनिर्वाचित खासदारांनी आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाºया महायुतीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली नाही. खासदार आले आणि गोंदियातून निघून गेल्याचे समाज माध्यमात झडकलेल्या काही छायाचित्रांमध्ये दिसून आले असल्यानंतर कळले. परिणामी त्यांच्या छूप्या दौºयामुळे सर्वसामान्य जनता आणि काँग्रेस संघटनेत प्रचंड नाराजी वर्तविली जात आहे. हा नाराजीचा सूर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संतापजनक तीव्र प्रतिक्रिया मधून दिसून आले. गोंदिया जिल्हा शिवसेना (उबाठा) पदाधिकाºयांनी तर यापुढे जेव्हा कधी खासदार गोंदियात येणार त्यांना त्यांच्या या कृती बद्दल काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणारअसल्याचे वक्तव्य युवा सेना जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *