भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील संपुर्ण तालुक्यात सुरू असलेली गोतस्करी, गोहत्या व ती थांबविण्याचे प्रयत्न करणा-या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळणाया धमक्यांना आळा घालण्यात यावा या मागणीचे निवेदन सर्व पोलिस ठाण्यात व जिल्हा पोलिस अधीक्षकांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून २३ जून रोजी देण्यात आले. काही महिन्यांमध्ये भंडारा जिल्ह्यातील संपुर्ण तालुका व ग्रामस्तरावर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैधरित्या गोवंश वाहतूक केली जात आहे. मात्र यावर आळा घालण्यात पोलिस प्रशासनाला यश आलेले नाही. एका विशिष्ट समाजातील व्यक्तीकडून गौवंश हत्या व गौमांस विक्री सारखे विकृत कृत्य करण्यात येत आहे. तर गोमातेचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करणा-या व गोसेवा करणा-या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना फोन किंवा इतर माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.
हा प्रकार सुरू असतानाच भंडारा जिल्ह्यालगत असलेल्यामध्यप्रदेशातील सिवनी परिसरात वैनगंगा नदीकाठावर जवळपास ५० गोवंशाचा गळा कापून मारून फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या अतिशय घृणास्पद व निंदनीय कृत्याचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल भंडारा जिल्हा कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करीत जिल्हा पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. हिंदू धर्माची आस्था असलेल्या गौमातेची रक्षा व्हावी व गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे भंडारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षकांना केली आहे. सदर मागणीचे निवेदन भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी, साकोली, मोहाडी, अड्याळ, आंधळगाव, तुमसर या पोलिस स्टेशनमध्येही स्थानिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आले निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष करमसी पटेल, जिल्हामंत्री डॉ.राकेश सेलोकर, जिल्हा सहमंत्री प्रकाश पांडे, नितीन निर्वाण, जिल्हा संयोजक विकास पडोळे, संजय खंडेलवाल, ताराचंद लंजे, आकाश रहांगडाले, यश शर्मा, सोनू बडवाईक, कंकर नान्हे, लोमेश लेदे, अरविंद हटवार, प्रचित कहू, ओम ठाकूर, सौरभ बांगरे, रवींद्र चाचेरे, प्रफुल देशमुख, नरेश राऊत, चंदू हूकरे, पंकज भिवगडे, निशांत पडोळे, गितेश कारेमोरे, रोहीत बर्रेकर यांच्यासह मोठ्या संख्येने बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.