भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : भरधाव चारचाकी वाहनाने पायी जाणाºया तरुणाला चिरडल्याची घटना २३ जून रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास अजुर्नी मोर-बोंडगावदेवी मार्गावर बोंडगावदेवी गावापासुन १ किमी अंतरावरील रोपवाटीकेजवळ घडली. अशोक शामराव कोल्हारे (३५) रा. बुधेवाडा असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील बाक्टी येथील मिलिंद विद्यालयात शिक्षक असलेले वाहनचालक जयेश साधु भोवते (५२) रा. दिघोरी मोठी. ता. लाखांदूर जि. भंडारा हे गाडी क्रमांक एमएच ३५ एजी १६६७ ने पत्नी मुलीसह ढासगड येथून अर्जुनी मोर मार्गे दिघोरीकडे जात असताना बोंडगावदेवी गाव परिसरात त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन अनियंत्रित होत पायी जाणाºया अशोक कोल्हारे याला जबर धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा सोबती पतीराम शंकर देवरे (४५) रा. बोंडगावदेवी हा थोडक्यात बचावला. अपघातानंतर वाहन रस्त्याच्या कडेला उतरले. घटनेची नोंद अर्जुनी मोरगाव पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे. आरोपी वाहनचालकाविरूद्ध भादंवीच्या कलम २७९, ३०४ (अ) सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला आहे.