भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन माजी खासदार शिशुपाल पटले यांनी जय हिंद सार्वजनिक वाचनालय सभागृह सिहोरा येथे २३ जून रोजी झालेल्या जिल्हा परिषद सिहोरा क्षेत्राच्या आढावा बैठकीतून बोलतांनी केले. माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीला तुमसर तालुका अध्यक्ष काशीराम टेंभरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर ध्वज गौतम, महासचिव गजानन निनावे व डॉ. मनोज पटले हे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सिहोरा जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या समोर मांडल्या. यात सिंचन सुविधा, भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्ग, सिहोरा, गोबरवाही मार्ग, सिहोरा चांदपूर मार्ग, चांदपुर पर्यटन, संजय गांघी निराधार योजना, सोंड्या टोला सिंचन योजनेच्या पाणी वितरण प्रणाली मध्ये बदल करणे, नियमित कर्ज फेडणाºया शेतकºयांना प्रोत्साहन निधी मिळणे अशा अनेक समस्या बैठकीत मांडल्या.
माजी खासदार शिशुपाल पटले यांनी संबंधित अधिकार्यांशी बैठकीचे आयोजन करून समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. या बैठकीला सिहोरा जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते सर्वश्री गोपाल येळे, दामू नंदनवार, सलाम शेख, नंदकिशोर तूरकर, सूरेस तुरकर, अरविंद पटले, पप्पू पारधी, राजू मेळेवार, दिनेश कामथे, अनिल इंगळे, संजय हरदे, ललित पटले, सतीश पटले, ओमकार चौहान, नरेश बोकडे, भीमा बघेले, रंजीत बिसने, राजु शरणांगत, अनिल रिनायते, त्रिनंद कटरे, मुकेश शुक्ला, अजय घोड़ीचोर, रवि वासनिक, कालू निनावे, धनेन्द्र नेवारे व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनोज पटले यांनी तर आभार प्रदर्शन सलाम शेख यांनी मानले.