भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आज गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाच्या वतीने खा. प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती व अराजकतेला आळा घालण्या संबंधीचे निवेदन निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक गोंदिया यांना देण्यात आले. यात प्रामुख्याने शहर अध्यक्ष नानू मुदलियार, लक्ष्मीचंद रोचवाणी, झनकलाल ढेकवार, विनायक शर्मा, रमेश कुरील, वेनेश्वर पंचबुद्धे, लव माटे, गौरव शेंडे, नरेंद्र बेलगे हे उपस्थित होते. गोंदिया शहरामध्ये मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडत आहेत. यात खुन, मारामारी, धमकावणे व लूटमार करणे, वाहन चोरी यासारखे प्रकार शहरामध्ये नित्याचेच झाले असून शहरातील अनेक अल्पवयीन मुले सुद्धा सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे यावर वेळीच आळा घातला नाही तर याचे भविष्यात भंयकर दुष्परिणाम पहायला मिळतील तसेच याचा विद्यार्थी व युवा वर्गावर सुद्धा वाईट परिणाम होत आहे. गोंदिया हे जिल्हयाचे ठिकाण असल्याने जिल्हयाच्या इतरत्र भागातून गोंदियाला शिक्षणाच्या दृष्टिने विद्यार्थी येत असतात त्यांच्या पालकांमध्ये सुद्धा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नागरिक हे रुग्णालयातील उपचार, व्यापार व रोजगाराच्या निमित्ताने शहरात येत असतात. गोंदिया शहरात व जिल्हयात वारंवार होत असलेल्या अप्रिय घटनांमुळे वाढत चाललेली अराजकता व गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शांतता भंग होत असून यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर वेळीच आळा बसविण्यात आला नाही तर गोंदियाला क्राइम सिटी अशी ओळख निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी योग्य ते पाऊल उचलुन दोषीवर कार्यवाही करावी. असामाजिक तत्वांना वाव मिळणार नाही याकरिता रात्रीला शहरातील संपूर्ण भागात पोलीस गस्त वाढविण्यात यावी. शहरात गुन्हेमारामारी व लूटपाट होणार नाही याकरीता पोलीस प्रशासनाने सक्रीयतेने कार्यवाही करावी. शहरात मुख्य ठिकाणी सी.सी.टी व्हीं लावण्यात यावे तसेच ज्या ठिकाणी लावण्यात आले आहेत ते ना दुरुस्त आहेत ते सुरू करण्यात यावे. शहरात होणा?्या सर्व प्रकारावर आळा घालण्यास योग्य ती कार्यवाही करण्यात यावी यासंबंधी गोदिया शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने समस्यांचे निवेदन निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक गोंदिया यांना देण्यात आले.