शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या ! चरण वाघमारे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आज संकटात सापडला आहे.त्याला आधार देण्याऐवजी सरकार शेतकºयांच्या नावाने राजकारण करीत आहे. शेतकºयाचे बेहाल झाले असतांना त्याकडे शासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांचे उत्पन्न वाढण्याऐवजी घटत आहे. अशा स्थितीत शेतकरी बांधवाच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. करीता धान उत्पादक शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी , धान पिकाची पेरणी ते कापणी पर्यंत ची कामे मनरेगातून करण्यात यावी, पशुपालकांना प्रती पशुमागे १ मजूर मनरेगातून उपलब्ध करून द्यावा तसेच तुमसर आणि मोहाडी या दोन्ही तालुकास्तरावरील शहरांना नियमीत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा विकास फाऊंडेशनच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा विकास फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिला. संताजी सभागृहत तुमसर येथे आज दि.२५ जनू रोजी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विकास फाऊंडेशन च्या वतीने आयोजीत तुमसर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. मेळाव्याला बूथ ते विधानसभा स्तरावरील सर्व अशा हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी आगामी विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत विकास फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चरण वाघमारे यांनी निवडणूक लढवावी. प्रसंगी विकास फाऊंडेशनचे कार्यकर्ते तन-मनधनाने निवडणूकीत काम करणार असा एकच आवाज यावेळी मेळाव्यात गुंजत होता. यावेळी विविध मागण्यासंदर्भात सामूहिक सह्याचे निवेदन तहसीलदार तुमसर यांचेमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. मेळाव्याला मंचावर धनंजय मोहोकर, डॉ. प्रकाश मालगावे, राजेश सेलोकर, अरविंद भालाघरे,सभापती कृउबास तुमसर भाऊराव तुमसरे, उपसभापती कृउबास रामदयाल पारधी, नंदुभाऊ रहांगडाले, डॉ. शांताराम चाफले,संचालक कृउबास रवींद्र बाभरे, हिरालाल नागपुरे, बबलु मलेवार,ललित शुक्ला, राजेश पटले, राजेंद्र तुरकर, अनिल जिभकाटे, हिरालाल रोटके, हरिश्चंद्र बंधाटे यांचेसह विविध गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास फाउंडेशनचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *