भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील कोडेलोहारा येथील ३९ वर्षीय महिला दिनांक २३ रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान आपले घरातील छपरीत झोपली असता गावातीलच मंगेश लक्ष्मण साखरे वय ४० वर्ष यांने तिचे छपरीत येऊन तिच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. महिलेस जाग आल्याने तसेच तिला लज्जा उत्पन्न झाल्याने आरडाओरड करून शेजारील मावस भावास बोलावण्यास गेली असता आरोपीने तिचे छपरीतील टीव्ही दगडाने फोडून नुकसान केली.याप्रकरणी फिर्यादी महिलेचे तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादवि कलम ३५४(अ),४२७ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास हवालदार विजयकुमार तिरपुडे करीत आहे
महिलेचा विनयभंग, पोलीसात गुन्हा दाखल
