नवी दिल्ली : विरोधी पक्षातील लोक जर हा विचार करत असतील की आमच्यामधील काही लोकांना पंक्चर करण्याचा त्यांचा विचार असेल तर हे लोक यशस्वी होणार नाहीत. आम्ही एनडीएबरोबरच राहणार आहोत. मात्र, इंडिया आघाडीमधून अनेक लोक येणार आहेत. अजून थोडा वेळ जाऊ द्या. नवा उत्साह आहे, त्यामुळे ते सध्या अशा पद्धतीचे बोलत आहेत. मात्र, येणारा वेळ सांगेल की इंडिया आघाडीमधील किती लोक पंक्चर होऊन आमच्याबरोबर (एनडीए) येतील. इंडिया आघाडी किती मजबूत आहे, हे येणारा काळच सांगेल , असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
आम्ही एनडीए सोबतच राहणार!
