प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शासकीय अधिकारी करतात शेतकºयांच्या अपमान

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयाच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम शेतकºयाच्या खात्यावर जमा केल्यावर तहसीलदार मोहाडी यांनी अन्यायग्रस्त शेतकºयाला अपात्र व्यक्तीच्या खात्यात जमा झालेल्या लाभाची रक्कम तब्बल सहा महिन्यानंतर ६०००/- रुपये निधी परत न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे लिखित पत्र दिल्याने शेतकºयांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असल्याने निवेदनाची दखल घेऊन सबंधित दोषी अधिकारी यांचेवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी मोहाडी तालुका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष जगदीश निमजे यांनी मान. नरेंद्र मोदी पंतप्रधान, मान. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, मान. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष भा.ज.पा. (म.रा.) यांना केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. सविस्तर असे की, मौजा डोंगरगाव, तह.मोहाडी. जि.भंडारा येथील खेमराज मोतीलाल समरीत यांचे गट क्र.- १३८ मध्ये ०.९५ हेआर, गट क्र. १३९२ मध्ये ०.१३ हे.आर तसेच गट क्र. १३९३ मध्ये ०.२८ हे. आर अशी एकूण १.३६ हे.आर शेतजमीन असून त्यांच्या बँक खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम दि. १८/४/२०२० ला २०००/- रुपये, दि. ३०/६/२०२० ला २०००/- रुपये तसेच दि. १०/८/२०२० ला जमा झाली.

परंतु तहसीलदार मोहाडी यांचे कार्यालयीन पत्र क्र. ३२९ दि. ९/११/२०२० अन्वये तब्बल सहा महिन्यानंतर खेमराज मोतीलाल समरीत या शेतकºयाला पत्र प्राप्त झाले. व सदर पत्रात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत देण्यात आलेला लाभ चुकीच्या खात्यात जमा झाल्याने लाभाची रक्कम ६०००/- रुपये तीन दिवसाच्या आत परत करण्यात यावे. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. असे नमूद करण्यात आल्याने, अन्यायग्रस्त शेतकºयाने दि. २/१२/२०२० ला तहसीलदार मोहाडी यांना सदर रक्कम खर्च करण्यात आली. तसेच सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी नसल्यास लिखित कळविण्याबाबत व कार्यवाही करण्याबाबत निवेदनात अन्यायग्रस्त शेतकºयाने नमूद केले होते. दिनांक १८/०५/२०२२ ला सदर शेतकºयाने तहसीलदार मोहाडी यांना सन २०२१ पासून सदर योजनेच्या लाभ मिळाले नसल्याचे लिखित पत्र दिले. तसेच दि. २३.११.२०२३ ला अन्यायग्रस्त शेतकºयाने तालुका कृषी अधिकारी मोहाडी यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळण्याबाबत निवेदन दिले.

तसेच दि. २०/०२/२०२४ ला माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये ‘जोडपत्र – अ’ अन्वये तहसीलदार मोहाडी यांना पत्र दिले. त्यानुसार जनमाहिती अधिकारी यांचे पत्र क्र. १८४ दि. २७/०२/२०२४ ला सहाय्यक जनमाहिती अधिकारी अव्वल कारकून मोहाडी यांना पत्र देण्यात आले. व सदर अर्जदाराने मागितलेली माहिती परस्पर पुरवून केलेल्या कार्यवाही बाबतची १ प्रत देण्याबाबत आदेशित करण्यात आले. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात अशा अनेक शेतकºयांच्या अपमान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अगोदर तीन एकर मालकी हक्क असलेल्या शेतकºयाचा निधी देऊन सन्मान केले. व नंतर त्याच शेतकºयाला निधी परत करण्याचे पत्र देऊन अपमान करणाºया अधिकाºयाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाºयावर कार्यवाही करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुकाउपाध्यक्ष जगदीश निमजे यांनी सबंधित मंत्री महोदयांना केल्याने शासन किती दिवसात दोषी अधिकाºयावर कार्यवाही करते व अन्यायग्रस्त शेतकºयाला प्रधानमंत्री सन्मान निधी देते. याकडे संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष केंद्रित झाले, एवढे मात्र नक्की.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *