भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आज सामाजिक न्याय दिन तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिनचे कार्यक्रम भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक लोहित मतानी , जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे,जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष महेश आव्हाड सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख तसेच समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती श्री. सूर्यभान हुमणे, श्री. महेंद्र गोंडाणे मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यालयाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतून 23 विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मध्ये संधी मिळाली त्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणवंतांचा सत्कार यावेळेस करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्तेची भरारी घेणारे अनेक गुणवंतांचा यावेळेस शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोहित मतानी यांनी स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यामध्ये शासकीय सेवेत यायचं असेल तर जिद्द चिकाटी मेहनत करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी तसेच आत्ताच्या इंटरनेट द्वारेहोणा?्यापरीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पेपर फुटीचे प्रकरण होत असताना ती परीक्षा पारदर्शक आणि गोपनीय पद्धतीने घेणे आव्हान असल्याचे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्यांनी विस्तृत असे सर्व स्पर्धा परीक्षांविषयीचे मार्गदर्शन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती कुरसुंगे यांनी छत्रपती शाहू यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश तर जात पडताळणी अध्यक्ष श्री. आव्हाड यांनी देखील सामाजिक न्याय दिनाच्या विषयीची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कार्यक्रमानंतर आठ महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर चे वाटप पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात मादक द्रव्य तसेच व्यसनाधीनता या विषयावर सामाजिक कार्यकर्ता श्री .मेंढे यांनी प्रबोधन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.