तहसील कार्यालयातील ट्रॅक्टर गेला चोरीला

रमाकांत खोब्रागडे तिरोडा : तहसीलदारांनी अवैध रेती वाहतूक प्रकरणी जप्त केलेल्या ट्रॅक्टर रात्रीचे वेळी चार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून याआधी याच तहसील कार्यालयातून रेती प्रकरणात जप्त ट्रॅक्टर चोरी गेला होता तर त्यानंतर तहसील कार्यालयात रेती प्रकरणातच जप्त असलेल्या टिपरचे टायर चोरी गेल्याची घटना घडल्याने या प्रकरणात तिरोडा पोलीस अजूनही याचोरी व्यकरणी काहीही कारवाई करू शकले नसतानाच काल रोजी आणखी एक ट्रॅक्टर चोरी गेल्याने तिरोडा तहसील कार्यालयातील शासकीय मालमत्तेसह जप्त केलेले खाजगी मालमत्तेचे सुरक्षा विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तिरोडा तहसील कार्यालयात चौकीदाराचे पद नसल्यामुळे येथे नेहमी चौकीदार नसले तरी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षात रात्रपाळी एक कोतवाल व दुसरे शासकीय कार्यालयातील एक कर्मचारी अशा दोघांचे ड्युटी लावण्यात आली असतानाही २५ तारखेला तिरोडा तहसीलदारांनी बिरोली घाटावरून अवध्य रेती वाहतूक प्रकरणी जप्त केलेला एक नवीन बिना रजिस्ट्रेशनचा टेम्प्रररी नंबरचा जप्त केलेला ट्रॅक्टर रेती सह २६ तारखेचे पहाटे अडीच वाजता चे दरम्यान तहसील कार्यालयाची गेटचे कुलूप तोडून चार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तहसील कार्यालयाचे सीसीटीव्ही कॅमेºयात रेकॉर्ड झाली असून या कार्यालयात रात्र पाळीत नियुक्त दोन्ही कर्मचारी गैरहजर असल्याने तसेच या आधीही या कार्यालयातून रेती चोरी प्रकरणी जप्त केलेल्या ट्रॅक्टर तर त्यानंतर जप्त केलेल्या टिपटचे टायर चोरून नेल्याची घटना घडल्याने तहसीलदार यांचे तक्रारीवरून तिरोडा पोलिसात चोरीची तक्रार दाखल झाली असताना पोलीस या चोरीचा तपास अजूनही लावू शकले नसताना आणखी एक ट्रॅक्टर या कार्यालयातून चोरीस गेल्याने या तहसील कार्यालयातील शासकीय मालमत्तेसह जप्त केलेल्या खाजगी वाहनांची ही सुरक्षा धोक्यात आली असली असून याबाबत बातमी लिहीपर्यंत तिरोडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद झाली नव्हती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *