भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : तेलंगणातील सरकारने शेतकºयांना २ लाख रूपयापर्यत सरसकट कर्ज माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी घेतला आहे. ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुबांना फायदा होणार आहे. तेलंगणातील ज्या शेतकºयांनी १२ डिंसेबर २०१८ ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीतील २ लाख रुपया पर्यतचे कर्ज घेतले आहे. ते सरकसकट कर्ज माफ करण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. तेलंगणा सरकार हे करू शकते तर महाराष्ट्राची का नाही ? महाराष्ट्र सरकारने सुद्धा तेलंगणाच्या धर्तीवर शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी पंचायत समिती तुमसरचे उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी शासनाला दिलेल्या निवेदनातुन केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महा- राज शेतकरी सन्मान योजना सुरू केली.
मात्र २५ टक्क्यांहून अधिक शेतकरी यापासून आजही वंचित आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकºयांना वार्षिक ३ हप्त्यांत ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, महाराष्ट्रातील हजारो शेतकरी केवायसी अभावी आजही वंचित आहेत. नियमित कर्ज फेडणाºया शेतकºयांना प्रोत्साहन अनुदानापोटी ५० हजार रुपये देण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली. मात्र, ५० टक्क्यांहून अधिक शेतकºयांना अद्याप ही मदत मिळालेली नाही. तेलंगणा सरकारने शेतकºयांसाठी कर्जमाफीसह विविध योजना प्रभावीपणे राबवून शेतकºयांना धीर देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा येथील शेतकºयांना सरसकट कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणी तुमसर पंचायत समितीचे उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी शासनाला दिलेल्या निवेदनातुन केली आहे.