गुंतवणुकीच्या नावे महिलेला १.६९ कोटींचा गंडा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : यूएस स्टॉक ब्लॉक ट्रेड आयपीओच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास १० ते २० टक्के लाभांश मिळून देण्याचे आमिष देत शहरातील एका महिलेला दिल्लीतील भामट्यांनी तब्बल १ कोटी ६९ लाख ३८ हजार २२२ रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार १४ एप्रिल ते २० जून दरम्यान घडला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरण सत्येन चौकसे (३९) ही महिला सध्या गोंदिया शहरातील न्यू लक्ष्मीनगर येथील प्रतिभा भावेश नशिने यांच्या घरी भाड्याने राहते. तिच्या मोबाइलवर आरोपींनी संगनमत करून शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने व्हॉट्सअ‍ॅपवर लिंक पाठविली. ती लिंक किरण यांनी उघडून बघितली असता मॉर्टिज स्टॉक मार्केट क्लब असे दिसले. त्या गह्युपच्या अ‍ॅडमिनने त्यांना गृपमध्ये अ‍ॅड केले. दरम्यान किरण यांना शेअर ट्रेडिंगकरीता ईट्स फुड हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना दिया नावाच्या महिलेने फोन करून रॉबर्ट मॉर्टिज स्टॉक मार्केट क्लब या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ट्रेडिंगकरीता यूएस ब्लॉक ट्रेड आयपीओच्या शेअरवर १० ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष देत पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार किरण यांनी १ कोटी ६९ लाख ३८ हजार २२२ रुपये त्यात गुंतविले. मात्र पैसे परत मिळाले नाही. शिवाय आरोपींनी उत्तर देणेही टाळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर किरण चोकसे यांनी रामनगर पोलिसांत तिघांविरोधात तकह्यार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *