भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : सध्या महाराष्ट्राचे राजकारण विचित्र झाले असून हास्यास्पद झाले आहे. ही परिस्थिती बदलण्याची ताकद केवळ युवकांमध्ये असून त्यांनी महापुरुषांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी राजकारणात यावे असे आवाहन युवा व राष्ट्रीय वक्ते अक्षय राऊत यांनी केले. बुधवारी दिनांक २६ जून रोजी स्थानीक राजाराम लॉन येथे आयोजित समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दरम्यान बोलत होते. सत्कार सोहळ्यात झालेल्या सुप्रसिद्ध कवि अनंत राऊत यांच्या कविता आणि किस्स्यांनी प्रेक्षक चांगलेच भारावून गेले. श्री महाकाल बहुउद्देशीय संस्था तुमसर च्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार मधुकर कुकडे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक तहसिलदार मोहन टिकले हे होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव काँग्रेस पक्ष प्रमोद तितिरमारे संचालक कृबास तुमसर किरण अतकरी, विवेक पडोळे, सभापती पशुसंवर्धन व कृषी विभाग राजेश सेलोकर जि. प. सदस्य राजू देशभ्रतार, एकनाथ फेंडर, उपसभापती शिशुपाल गौपाले, सरपंच छगन पारधी, डॉ. राजू ठाकूर जिल्हाध्यक्ष रा. काँ. शरदचंद्र पवार बालाघाट, डॉ जितेंद्र जितुरकर, पवन खवास, हेमराज नागफासे, आत्माराम मुंगुसमारे, अनिता गजभिये, उषा रामटेके, शुभम गभने, राहुल भुतांगे, राहुल तुमसरे, कृणाल मुलेवार, शिव पटले, रजत कहालकर, जय गहाणे, निलकंठ देशमुख, संजय गौपाले, रूषी गौपाले, बंटी नागपुरे, नानु परमार, पवन पारधी, देवचंद टेंभर, सुधीर गोमासे, अनिल कारेमोरे, रोहित बोंबार्डे, अजय शरनागत, हर्षल बनकर, अविनाश लांजेवार, विजय सहारे, जय मोरे, डुलीत कापगते, ज्ञानेश्वर राऊत हे मंचकावर उपस्थीत होते. पुढे अक्षय राऊत यांनी देश घडविण्यासाठी शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे करावा या बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथासंस्थापक अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमा दरम्यान तुमसर मोहाडी तालुक्यातील १० वी व १२ वी च्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, मान चिन्ह, पाणी बॉटल, टिफीन बॉक्स देवून सत्कार करण्यात आला.