भंडारा पत्रिका/वार्ताहर कोंढा-कोसरा : कारधा ते नीलज राष्ट्रीय महामार्गाचे काम कासव गतीने सुरू आहे. कामावर एक वर्षात पवनी ते कोंढादरम्यान मोठमोठ्या भेगा पडल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच भेगांमुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणी जोर धरत आहे. नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गाला लागून कारधा नीलज राज्य मार्गास राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ अशी मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे.
पण, काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर दिसून येते. कोंढा ते पवनीपर्यंत महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्त्याच्या मधोमध भेगा असल्याने सायकलस्वार, मोटारसायकलस्वारांचे चाक खड्यात जाऊन अनेक दुचाकीस्वार पडले आहेत. चार दिवसांपूर्वी कोंढा येथील नंदकिशोर नागपुरे पवनीहून येत असताना रस्त्याच्या उभ्या पडलेल्या भेगेत गाडीचे चाक जाऊन गाडीवरून पडले. त्यामुळे त्यांचे पाय मोडले. अशा अनेक घटना दररोज महामार्गावर तरीदेखील याकडे होत आहेत. कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. सध्या मोटारपंप शेतकरी रोवणी करीत आहेत, चिखल घेऊन ट्रॅक्टर असणारेशेतातील रोडवर माती चिखल महामार्गावर पसरवीत असल्याने देखील अपघात होत आहे. कारधा नीलज महामार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एक वर्षातच या महामार्गाला ठिकठिकाणी उभ्या भेगा पडल्या आहेत.