सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांनी घेतली अपघाती मृत्यूच्या घटनेची दखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर रोड- देव्हाडी रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाने पायदळ रस्ता ओलांडणाºया युवकाला जोरदार धडक दिली होती. त्यात युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांनी ठाणेदार नरेंद्र हिवरे यांना २ मे २०२४ रोजी निवेदन देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. परंतु अपघाताला जबाबदार असणाºया वाहनचालकाचा अजूनपर्यंत शोध लागला नाही. या घटनेला दोन महिने होऊन गेले. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या युवकाच्या कुटुंबाला न्याय केव्हा मिळेल? असा प्रश्न आता येथे उपस्थित होत आहे. अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव पलाश केशवराव तलमले (२५, रामकृष्णनगर, तुमसर) असे आहे. २१ एप्रिल रोजी पलाश हा केटरिंगच्या कामानिमित्त घराबाहेर पडला. सायंकाळी चार वाजता बालाजी लॉन येथे एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. देव्हाडी रस्त्यावरील विरुद्ध बाजूस चहा पिण्याकरिता तो प्रणय भीवणकर याच्यासोबत रस्ता ओलांडून गेला होता. परत रस्ता ओलांडताना तुमसरकडून देव्हाडीकडे जाणाºया एका अज्ञात पांढºया रंगाच्या चारचाकी स्विμट कारने पलाशयाला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. पलासला त्याच्या मित्र प्रणय व इतर साथीदारांनी मिळून शासकीय सुभाषचंद्र बोस रुग्णालय तुमसर येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाºयांनी त्याचे व प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा करिता भंडारा येथे रेफर केले. भंडारा येथे उपचार केल्यानंतर पलाशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे नेण्यात आले.

उपचारादरम्यान पलाशची प्रकृती चिंताजनक होत गेली आणि दोन दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. २६ एप्रिल रोजी तुमसर पोलिस ठाण्यात बेदरकारपणे वाहन चालवणाºया वाहन चालकाविरुद्ध तक्रार देण्यात आली. तुमसर पोलिसांनी भादंवि. २७९, ३३८, ३०४, सहकलम १८४, १३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु अज्ञात वाहनचालकाचा अजूनपर्यंत शोध लागला नाही. त्यामुळे पीडित तलमले कुटुंबांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांची भेट घेऊन सांगितले की, अपघाताला दोन महिन्यांच्या कालावधी होऊन सुद्धा अद्यापही आरोपी मोकाटचं असल्याने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त होत आहे. यावर उपविभागीय पोलिस अधिकाºयांनी सांगितले की, सदर प्रकरण ९ जून २०२४ रोजी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे वर्गकरण्यात आला असून यामध्ये लवकरच आरोपी शोधून काढला जाईल आणि त्याला कठोर शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, शाखा प्रमुख रोशन ढोके, केशव तलमले, योगेश चिंधालोरे, प्रतिक तलमले, बाळकृष्ण भोंगाडे, अतुल पोटभरे, अल्पित आगाशे, अमृत चरडे, विक्की वैरागडे, पवन पोटभरे, भूषण सानेकर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *