भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील पारडी येथील रहिवाशी वनीत कुंडलिक नाईक (३२) याचे दिघोरी ते खराशी मार्गावरील वळणावर अपघात घडले होते. त्या अपघातानंतर उपचारा दरम्यान त्याचा मूत्यू झाल्याने कुटुंबातील कर्ता पुरुष मृत पावल्याने कुटुबियांवर मोठे दु:खाच्या डोंगरासह आर्थिक संकट कोसळले होते. अशा परिस्थितीत पारखी येथील सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी या कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला. व गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत २ लाखाचा विमा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील रहिवासी स्वप्नील कुंडलिक नाईक हे दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजी काही कामानिमित बाहेर गावी जात असतांना त्यांचा दिघोरी ते खराशी मार्गावरील वळणावर अपघात झाला होता. ते त्यात गंभीररित्या जखमी झाले होते. दरम्यान त्याला पुढील उपचारासाठी साठी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतक हा अल्पभूधारक असून त्याच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
मात्र घरात एकटाच व्यक्ती कमविता असल्याने व त्याचेही अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले होते. अशा परिस्थिती पारडी येथील सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी कुटुंबियांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली व त्यांना धीर देत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची माहिती देत त्या अंतर्गत दोन लाखाची मदत मिळवून देण्याचे आस्वासन दिले होते. त्यानुसार दहिवले यांनी सर्व कागद पत्राची मृत्यूवरून शासनस्तरावर पाठपुरावा करून मृतक स्वप्नील यांच्या कुटुंबियांना नुकतीच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून २ लाखाची आर्थिक मदत मिळवून दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्त मानबिंदू दहिवले यांचे नाईक परिवाराने आभार मानले. यापूर्वीसुद्धा मानबिंदू दहिवले यांनी अनेकांच्या दु:खात मदतीला धावून कित्येकांना विविध योजनेतून मदत मिळवून दिली आहे, हे विशेष.