भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्राच्या महायुती सरकारने सादर केलेला अतिरिक्त अर्थसंकल्प हा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा आणि लोकाभिमुख असल्याचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर बोलण्याच्या दृष्टीने आज त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. गोरगरीब, मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी, शेतकरी, युवा, महिला आणि समाजातील सर्वच महत्त्वाच्या घटकांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेश्- ाक संकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. आम्ही मागितलं म्हणून मिळाले अशी प्रतिक्रिया अर्थसंकल्पाच्या बाबतीत विरोधकांकडून दिली जात असेल तर अर्थसंकल्प हिताचा आणि सर्वच कसोट्यांवर खरा उतरणारा आहे हे स्पष्ट होते. या लोकाभिमुख अर्थसंकल्पासाठी संपूर्ण सरकारचे अभिनंदन करतो असे म्हणाले. महिलांसाठी अमलात आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाकांशी आणि महिलांना स्वबळावर उभी करणारी आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थी महिलेला मिळावा या दृष्टीने भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही स्वत: पुढाकार घेत अशा लाभार्थ्यांना मार्गदर्शन आणि सर्व प्रकारची मदत करण्यासाठी कक्ष उभारणार असल्याचे सुनील मेंढे यांनी सांगितले. सामूहिक विवाहासाठी १० हजाराचे अनुदान वाढवून २५ हजार करण्यात आले आहे.
पर्यटन स्थळाच्या ठिकाणी वास्तव्य असलेल्या महिलांसाठी “आई” योजनेच्या माध्यमातून उद्योग उभे करण्यासाठी १५ लाखाचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार असल्याचे मेंढे यांनी सांगितले. शेतकºयांना वीज बिल माफ, मागेल त्याला सौर पंप अशा योजना शेतकºयांच्या हिताच्या ठरणार आहेत. १० लाख तरुण तरुणींना १० हजार विद्या वेतन आणि उद्योगासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. आदिवासींना घरकुलासाठी १०० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थ संकल्प समाजातील सर्व घटकांना विशेष भेट देणारा असल्याचे सांगून या योजना लोकांपर्यंत पोहचाव्या म्हणून आम्ही भाजपाचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करू, असेही माजी खा. सुनील मेंढे म्हणाले. पत्रकार परिषदेला चैतन्य उमाळकर, अनुप ढोके, मयूर बिसेन, विनोद बांते, प्रेमचंद भोपे, मधुरा मदनकर, चंद्रकलाताई भोपे आदी उपस्थित होते.