साकोली उड्डाणपूलावर डिवाईडरला कारची टक्कर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर साचलेले पाणी कारच्या समोरील भागावर उडाल्याने कारचालकाचे कार वरील नियंत्रण सुटून डिव्हायडर ला धडक दिल्याने अपघात झाला या घटनेत कारचालक डॉक्टरसह त्याच्या आईचा मृत्यू झाली तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार साकोली उड्डाणपूल वरून रायपुरहून नागपुरकडे जाणारी कारने डिवाइडरला जबरदस्त धडक दिली. ही घटना शनिवार २९ जूनच्या सायं. ०५:४५ ची आहे.

साकोली पोलीसांनी घटनास्थळगाठून स्थिती हाताळली. सविस्तर की, रायपुर ( छ. ग.) येथील होंडा कार क्रमांक सीजी ०४ एचजे ४४८४ नी डॉ. सुफल गजभिये आपल्या परिवारांसह मोठ्या भावाच्या मुलाचे लग्नाला रायपुर ते नागपुर जात होते. पण शनिवारी सायं. ४:४५ ला साकोली उड्डाणपूल वर अर्धा तासांपूर्वी आलेल्या पावसाने उड्डाणपूलावर पाणी साचले होते. यात त्यांच्या कारवर साचलेला पाणी उडाला व रस्त्याचा अंदाज न आल्याने कार अनियंत्रित झाली आणि घसरत जाऊन वेगाने डिव्हायडरला धडकली.

ज्यामधे कार सवार डॉ. सुफल यांची आई कांता गजभिये वय ८५ यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी डॉ. सुफल गजभिये वय ५२ व त्यांचा मुलगा शिवान सुफल गजभिये वय १४ यांस जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार सुरू असता उपचारा दरम्यान डॉ. सुफल गजभिये यांचीही प्राणज्योत मालवली. तथा शिवान गजभिये गंभीर जखमी असून त्याचेवर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद साकोली पोलीसांनी घटनास्थळी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस चमु करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *