भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- नीट परिक्षा पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतांनाही केंद्र सरकार मार्फत अद्याप ही कुठली कार्यवाही होताना दिसत नाही. नीट पेपर फुटीच्या मूख्य सूत्रधार व छोट्यामोठ्या माशांना पकडून थातुरमातुर कार्यवाही करण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र व राज्य सरकार मोठ्या पदभरती घेत नसल्यामुळे मोठया प्रमाणात युवक बेरोजगार आहेत. राज्यात पोलिस भरती, बँकेच्या पदभरती, रेल्वेच्या पद भरती, पोस्ट आॅफिस भरती,आॅडनेन्स, जिल्हा परिषद तसेच नगर परिषद पदभरती अश्यातच बेरोजगार युवक मोठ्या आशेने भरतीमध्ये अर्ज भरून वर्षभर त्यावर मेहनत करत असतात. परंतु अश्या पेपर फुटीचा परिणाम योग्य परीक्षार्थीवर होतो व योग्यता असलेला पात्र व्यक्ती नौकरी पासून वंचित राहतो. केंद्र सरकार व राज्य सरकारने अशा होणाºया पेपर फुटी विरोधात कठोर कायदा आणावा व यापुढे पेपर फुटी सारखे प्रकार होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेण्याची मागणी भंडारा, गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत यादवराव पडोळे यांनी केंद्र सरकार ला निवेदनाच्या माध्यमातून केली आहेत.