भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- रा.प. महामंडळाने घेतलेल्या ‘ हिंदुहृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘ब’ वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रु.२५ लाखाचे बक्षीस मिळाले आहे. तर नागपूर विभागातून लाखनी बस स्थानकाला पहिला क्रमांक आला असून बस स्थानकाला १ लाख रुपयाचे बक्षीस मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १ मे, २०२३ ते ३० एप्रिल, २०२४ या काळामध्ये रा.प. महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ‘ हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबविले गेले. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकायार्तून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घडयाळ, सेल्फीपॉईट, ही कामे करण्यात आली. या बरोबरच प्रवाशांना मिळणाºया सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छते बरोबरच त्यांची तांत्रिक दुरुस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळ्या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले.
या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षीसासाठी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांची त्या बसस्थानकांवरील प्रवासी फेºयांच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बस स्थानकाला राज्यस्तरावरील अंतीम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटी रूपयाची बक्षीसे देण्यात येणार असून, येत्या १५ आॅगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रदेशनिहाय बक्षीस पात्र बसस्थानकांची यादी सोबत जोडली आहे. रा.प. महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व बक्षीस पात्र बसस्थानकांचे अभिनंदन केले असून, या अभियानातून “आपलं गावं आपलं बसस्थानक, स्वच्छ सुंदर बसस्थानक” ही संकल्पना रा.प. कर्मचाºयांच्या बरोबरच स्थानिक रहिवाश्यांमध्ये रुजविण्यास मदत झाली आहे.