शेतकºयांना पाणी मिळत नाही म्हणून आम.भोंडेकर यांचा धाडसी निर्णय

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पवनी तालुक्यातील तीन उपसा सिंचन योजना पूर्ण झाले असले तरीही या योजनेच्या पाणी करीता शेतकºयांना वाट बघावी लागत होती. या करीत आज आम. नरेंद्र भोंडेकर यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि या तीनही उपसा सिंचनाचे औपचारिक लोकार्पण करून गरजू शेतकºयांना पानी देण्यास सुरुवात केली. यात गोसे खुर्द, अकोट व शेळी या उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. आम. भोंडेकरांच्या या धाडसी निर्णया मुळे या क्षत्रेतील शेतकºयांची चिंता दूर झालेली दिसून आली. गोसे खुर्द प्रकल्पाच्या निर्मिती नंतर अनेक शेतकºयांना सिंचन उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु या प्रकल्पा वरील काही उपसा सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले तरीही ते लोकार्पणच्या प्रतिक्षेतच आहेत. यात गोसे खुर्द, आकोट व शेळी या तीनही उपसा सिंचन योजना सुद्धा पूर्ण झाल्यावर सुरू करण्यात आल्या नव्हत्या. ज्या मुळे गोसे खुर्द च्या ७४५० हेक्टर, अकोट च्या ७५० हेक्टर व शेळी च्या २७०० हेक्टर क्षेत्राला सईचणा पासून वंचित राहावे लागत होते. या सिंचन योजना पूर्ण झाल्यावरही पाणी मिळत नसल्याने या क्षेत्रातील शेतकरी हलाकान झाला होता आणि योजनेचे लवकर लोकार्पण करण्याची मागणी धरून होते.

ही मागणी लघेऊन आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या कडे शेतकरी पोहोचले असता आम. भोंडेकर यांनी आज वरील तीनही योजनेला भेट देण्याचे ठरविले. आकोट उपसा सिंचन योजनेवर पोहोचले असता त्यांना शेतकºयांनी सांगितले की, वर्तमान परिस्थितीत या क्षेत्रातील शेतकºयांना आपले परे टिकवून ठेवण्या करीत पाण्याची नितांत आवश्यकता आहे. जर पानी मिळाले नाही तर शेतकारी हलाकान होऊ शकतो. शेतकºयांची ही अवस्था बघता आम. भोंडेकर यांनी गोसे खुर्द, अकोट व शेळी या तीनही उपसा योजनेचे औपचारिक लोकार्पण करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि योजनेच्या ठिकाणी पोहचून लोकार्पण केले सोबतच या क्षेत्रातील शेतकºयांना अखंडित पानी पुरविण्याचे अधिकाºयांना निर्देश दिले. आम. भोंडेकर यांच्या निर्णय मुळे क्षेत्रातील शेतकºयांच्या चेहºयावर आनंद दिसू लागला आणि त्यांनी आम. भोंडेकर यांचे आभार मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *