भंडारा पत्रिका/प्रतिनिधी _लाखांदूर : तालुक्यातील डांभेविरली हे गाव वैनगंगा नदी तीरावर व भंडारा चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावरती भागात वसलेले गाव आहे . या गावातील शेत शिवार वैनगंगा नदी लगत पलीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील नदीलगत तपाळ देवस्थान आहे. या देवस्थानमध्ये तिन ते चार दिवसात नवस फेडण्याचा कार्यक्रम करीत राहत असतात . त्या देवस्थान मंदिरात बकºया कोंबड्याचे भाव देत असतात त्यामुळे तिथे पट्टेदार वाघ राहत असतात. भटकत ते वैनगंगेच्या पलीकडे नदी काठावर आले ते चार वाघ असून आज सकाळी ७ वाजता डांभेविरली-गवराळा येथील शेतकरी शेतात काम करण्यासाठी जात असताना अचानक एक मोठा वाघ व तीन बच्छडे दिसल्याने शेतकºयांची पळापळ झाली. मागील अनेक दिवसापासुन या परिसरात वाघ दिसत असल्याने या भागातील शेतकºयांनी वनविभागाकडे माहिती दिली होती. मात्र वनविभागाने शर्तीचे प्रयत्न करूनही शेतशिवारातून बाहेर काढता आले नाही. आज डांभेवीरली-गवराळा रस्त्यावर चारही वाघ दिसून आल्याने पुन्हा दहशत निर्माण झाली.
वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग लाखांदूर यांनी आठ वाजता दोन्ही मार्ग बंद करून वाघीण व वाघाच्या बछड्यांना वैनगंगानदी कडे सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी गवराळा डांभेविरली गावातील शेकडो शेतकरी व ग्रामस्थांनी वाघिणीला व वाघिणीच्या बछड्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली. वाघाच्या दहशतीमुळे शेतीचे काम थांबले आहे. वाघांच्या तात्काळ बंदोबस्त करण्याच्या मागणीला घेऊन आज डांभेविरली येथील सरपंच तथा ग्रामपंचायत कमिटी शेतकरी व अनेक ग्रामस्थांनी येथे बैठक घेऊन तात्काळ सदर वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी चे निवेदन डी .एफ. ओ. वन विभाग कार्यालय भंडारा, एसीएफ वनविभाग कार्यालय साकोली, वनपरिक्षेत्र अधिकारी वन विभाग लाखांदूर यांना देण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित व वन विभाग कर्मचारी लाखांदूर, भाजपा तालुका अध्यक्ष लाखांदूर प्रमोद प्रधान, पोलीस पाटील प्रधान . माजी सरपंच दिपक बुराडे माजी सैनिक अर्जुन बुराडे . उपसरपंच उमेश देशमुख . वनपाल सावसाकळे, फॉरेस्ट गार्ड व पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावन्यात आला होता