भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्रीमाझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै असून यासाठी तालुका पातळीवर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वय्याने काम करावे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम असल्याने ही योजना ग्रामपंचायत पातळीवर पोहोचवावी असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी आज दिले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी महिला बालविकास अधिकारी मनीषा कूर्सुंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नंदा गवळी तसेच यांनी विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी हे आॅनलाइन उपस्थित होते. याविषयी बोलताना श्री.कुर्तकोटी म्हणाले की संबंधित शासन निर्णय सर्वांनी वाचून घ्यावा, तसेच याबाबतीत प्राप्त अर्जांची यादी ती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात यावी. कोणाला आक्षेप असल्यास ते आॅफलाईन तसेच आॅनलाईन नोंदवण्यात यावे.
हा कालबद्ध कार्यक्रमात असल्याने वय दाखले, उत्पन्नाचे दाखले, बँकेने झिरो बॅलन्स खाती तातडीने उघडावीत. तसेच सेतू केंद्र आपले सरकार केंद्र यामध्ये आलेले अर्ज सध्या आॅफलाईन व नंतर शासनाने दिलेल्या पोर्टलवर आॅनलाईन नोंदवावीत. अर्ज करण्याची सुरुवात काल एक जुलैपासून करण्यात आली आहे, तर १० आॅगस्टपर्यंत लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई केवायसी करणे गरजेचे आहे लाभार्थी निधी हस्तांतरण १४ आॅगस्टपर्यंत करावयाचे असल्याने यासाठी कालबद्ध वेळेत हा कार्यक्रम राबवायचा आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय समिती देखील गठित करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अजार्चा नमुना उपलब्ध करुन दिला जात आहे. वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या व ६० वर्षे ज्यांची पूर्ण झाली नाहीत अशा वयोगटातील महिलांनी हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावयाची आहेत. तालुका पातळीवरील महिलांनी हे अर्ज नगर परिषद/नगर पंचायत तसेच अंगणवाडी केंद्र येथे तर महानगरपालिका क्षेत्रात हे अर्ज प्रभाग कार्यालयात जमा करावयाची आहेत. याबाबत संबंधित तालुक्याचे मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी व कर्मचाºयांना योग्य ते निर्देश दिले असल्याचे महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणामहोतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्रीमाझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.