भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या सभेमध्ये सर्वात आधी सहकार क्षेत्रात तुमसर बाजार समिती मध्ये निवडून आल्याबद्दल पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांचे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले तसेच संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा जिल्ह्याच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. लोकसभेच्या निवडणूकी नंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ता बैठकीं मध्ये निवडणूक मधल्या आलेल्या समस्येवर निराकरण करण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे साकडे टाकावे अशी देखील सूचना काही पदाधिकाºयांनी केल्या. लोकसभे मध्ये शरद पवार साहेबाचे विचार व नवीन तुतारी वाजविणारा माणूस हा चिन्ह लोकांपर्यंत पोहचविले व महाविकास आघाडीचे कॉग्रेस चे उमेदवार प्रशांत पडोळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा खारी चा वाटा आहे व सामान्य जनता ही शरद पवार साहेबाचे हाथ मजबूत करण्यासाठी तयार आहेत. गाव गावात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते साहेबांच्या पक्षात प्रवेश करत आहेत.भंडारा पवनी येथे २३ हजाराची लीड मिळाली व तुमसर विधानसभा मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाली असल्याने येत्या भंडारा पवनी व तुमसर विधानसभा निवडणुकीत मध्ये शरद पवार साहेबांचे शिपाई हे निवडणूक मध्ये पक्षाच्या चिन्हावर उभे राहणार असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी देखील या २ विधानसभा वर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे भंडारा पवनी व तुमसर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कामाला लागण्याचे सूचना दिले आहेत.
कार्यक्रमाप्रसंगी किरण अतकरी जिल्हा अध्यक्ष, नरेश ईश्वरकर जिल्हा परिषद सदस्य, एकनाथ फेंडर जिल्हा परिषद सदस्य, दिलीप सोनुले जिल्हा सरचिटणीस, अजय मेश्राम भंडारा -पवनी विधानसभा अध्यक्ष, मधुकर भोपे उपाध्यक्ष, मधुकर चौधरी शहर अध्यक्ष, नरहरी वरकडे अनुसूचित जमाती अध्यक्ष, राजेश शिवरकर मच्छीमार, भोई समाज अध्यक्ष, अनिता गजभिये जिल्हा अध्यक्षा, प्रमोद घरडे महामंत्री, सानिया खान शहर अध्यक्षा, कुनाल पवार, यशवंत भोयर, बबन बुधे, सुखराम अतकरी, सुनील शेंडे, प्रफुल्ल गायधने, विनोद वट्टी, अरुण गोंडाणे, उषा रामटेके, वैशाली खोब्रागडे, शारदा ढेंगे, मोना मुटकुरे, आरती मुटकुरे, निलिमा रामटेके, लता बावनकुळे, योगीता सुर्यवंशी, यशवंत चानोरे, ईश्वर कळंबे, विजय बारई, शकील खान, एजाज शेख, किशोर मुलुंडे,मोरेश्वर पंचबुध्दे, निशिकांत लेंडे, गणेश ठवकर, राकेश हटवार, विजय नवखरे, महादेव बांते, राजकुमार बांते, विनोद लिल्हारे,संजय नवखरे, राहुल पवनकर, गंगाधर सेलोकर,भुपेंद्र सेलोकर, हेमराज कापसे, वामन राउत, अविनाश नान्हे, अरविंद कानेकर, विशाल झंझाड, भाऊराव डायरे, सुशील चौधरी तुमसर, प्रमोद घरडे महामंत्री व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.