पिक विम्याची मिळालेली तुटपुंजी रक्कम शेतकºयाने केली जिल्हाधिकारी कार्यालयाला परत!

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : खरीप २०२३ मध्ये शेतकºयांनी प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत धान शेतीचा पिक विमा काढलेला होता. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे विमा कंपनीकडून सर्वे करण्यात आला होता. परंतु विमा कंपनीकडून शेतकºयांची थट्टा करण्यात आली. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी येथील शेतकरी सुखदास गोमा डहाके यांनी पिक विम्याचे १८०० रुपयाचा धनादेश दि. १ जुलै २०२४ ला कृषी दिनी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांना परत केला. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असते. आणि त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावा लागतो. याच परिस्थितीमुळे काही शेतकरी हे आपले कर्ज फेडू न सकल्यामुळे स्वत:चे जीवन संपवण्याचे निर्णय घेतात. आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतपिकाला सुरक्षा कवच म्हणून पिकांचा विमा काढला जातो. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकºयांना पीक विमा कंपनींकडून आर्थिक मदत दिली जाते. मागील वर्षात शासनाकडून पिक विमा योजनेत बदल करण्यात आले व शेतकºयांना पिक विमा रक्कम १ रुपया करण्यात आली. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचा विमा काढला. बºयाच शेतकºयांची उपजिवीका ही शेतीवर अवलंबून आहे. बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत. बरेच शेतकरी स्वत:चे आयुष्य दारिद्रय रेषेखाली जगत आहेत.

पूर्वी निसर्गचक्र योग्यरितीने चालत होते. त्यावेळी शेती उत्पादन हे कमी मात्र कसदार आणि शाश्चत होते. मात्र सद्यपरिस्थितीत अवकाळी पाऊस तसेच विविध रोगांचा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नावर मयार्दा आली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ, वातावरणातील बदल यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव अशी अनेक प्रकारची आव्हाने शेतीपुढे निर्माण झाली आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम शेतकºयांच्या उत्पन्नावर होतांना दिसून येतो. नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकºयांना आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे. परिणामी काही शेतकरी नापिकी व कजार्ला कंटाळून टोकाचे पाऊल उलचून जीवन संपवण्याचे निर्णय घेत असतात. नैसर्गिक संकटातून शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पीक विमा योजना महत्वाची भूमिका बजावत असते. शेतपिकाला सुरक्षा कवच म्हणून पीक विमा काढला जातो. गारपीट, वादळवारा, अतिवृष्टी, चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला म्हणून पीक विमा कंपन्यांकडून शेतकºयांना आर्थिक मदत दिली जाते. पीक पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, किड व रोग इत्यादी बाबींमुळे नुकसान झाल्यास पिक विमा शेतकºयांना मिळण्याची तरतूद आहे.

मोहाडी तालुक्यातील शेतकºयांनी मोठ्या संख्येने खरीप २०२३ मध्ये पिक विमा काढलेल्या होता. नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ ला तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले होते. शेतकºयांची अशी बिकट परिस्थिती असतांना व या सर्व परिस्थितीची नोंद महसूल विभाग आणि कृषी विभागाकडे असतांना सुद्धा शेतकºयांना मिळत असलेली पिक विम्याची रक्कम हि खूपच कमी आहे. बºयाच शेतकºयांना पिक विम्याची रक्कम १०००, १५०० अशी अत्यल्प आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून शेतकºयांची थट्टा होत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील शेतकºयांना मिळत असलेल्या अत्यल्प पिक विमा रकमेबाबदच्या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील का असा सवाल तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *