भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : महाराष्ट्रात महायुती सरकारणे महारष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लागू केली असून सदर योजनेकरिता ०१ जुलै पासून अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आले आहे यामध्ये पात्र महिलांना अधिवास प्रमाणपत्राची अट घातलेली आहे. गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाचा जिल्हा असून जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्याच्या सीमा लागून असल्यामुळे जिल्ह्यात बहुतांश परिवारात मध्यप्रदेश व छत्तीसगढ जिल्ह्यातील कुटुंबाशी सोयरी झालेली असल्याने ज्या महिलांचा मूळ जन्म मध्यप्रदेशात झालेला आहे त्यांचेकडे महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नाही त्यामुळे बहुतांश महिला यो योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे केंद्र शासनाच्या सूननेनुसार आता प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड ग्राह्य धरण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी आपले आधारवर जन्म्तारिख व मूळ पत्ता, लग्नानंतरचे नावे अपडेट केलेले असल्यामुळे सदर अधिवासप्रमाणपत्राची अट शिथिल करून आधार कार्ड ग्राह्य धरून अर्ज स्वीकारन्याबाबत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केली असल्याने सदर अट शिथिल झाल्यास महिला भगिनींना मोठा दिलासा मिळणार आहे.