लाडकी बहीण योजनेमधील जाचक अटी शिथील करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्टÑ सरकारने जाहिर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे अधिवास प्रमाणपत्र व त्याकरीता आवश्यक असलेली जन्म दाखल्याची अट रद्द करून शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या आधारे अधिवास ( डोमीसाईल)प्र्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी भाजपचे भंडारा न.प.चे माजी उपाध्यक्ष आशु गोंडाणे यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.त्याअंतर्गत महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या वय वर्ष २१ ते ६० पर्यतच्या महिलांसाठी दरमहा १५०० रुपये अनुदान मिळणार आहे . या योजनेमध्ये दिलेली मुद्दत दिनांक ०१ जुलै ते १५ जुलै २०२४ अशी देण्यात आली आहे.आपला भंडारा जिल्हा हा शेती प्रधान असल्यामुळे गावा-गावामध्ये धान पेरणीचे काम सुरू आहे.तसेच मुलांना शाळेमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे यामुळे एवढ्या कमी वेळात पात्र लाभार्थ्यांना अर्ज आॅनलाईन भरणे कठीण होत आहे. सदर योजनेमध्ये जन्माचा दाखला असणे आवश्यक असुन अनेकांकडे त्यांच्या जन्माचा दाखला नसल्यामुळे टी.सी. (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) आधारे डोमीसाईल तयार करण्यासाठीची परवानगी देण्यात यावी जेणेकरून पात्र लाभार्थींना अर्ज करणे सोयीस्कर होईल अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदन उप जिल्हाअधिकारी स्मिता बेलपात्रे मॅडम यांनी स्विकारले. याप्रसंगी आशु गोंडाने ,रूबी चढ्ढा , सचिन कुंभलकर , शैलेश मेश्राम , भूपेश तलमले , नितीन तुमाने , ढोमने , निलेश रामटेके , राजेश टिचकुले , पपु खैरे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *