सार्वजनिक वाचनालयातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सार्वजनिक वाचनालय भंडारा तर्फे मार्च २०२४ मध्ये स्टेट बोर्डच्या वर्ग १० वी च्या परिक्षेत ९३ टक्के व वर्ग १२ वी च्या परिक्षेत ९३ टक्के तसेच सी.बी.ए.ई. पॅटर्नच्या वर्ग १० वी च्या परिक्षेत ९५ टक्के व १२ वी च्या परिक्षेत ९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थ्यांनींचा सत्कार कार्यक्रम, दि. ०२/७/२०२४ ला वाचनालयाचे इंद्रराज सभागृहात संपन्न झाला. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून लिना फलके पुनर्वसन अधिकारी, भंडारा व शैलेजा वाघ (दांदळे) जिल्हा माहिती अधिकारी भंडारा, वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल व कार्यवाह डॉ. जयंत आठवले व सहकार्यवाह प्रदिप गादेवार उपस्थित होते. प्रास्ताविकात वाचनालयाचा विकास व विविध सेवाबद्दल माहिती सांगण्यात आली. शैलेजा वाघ यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर समाज जीवनावर मार्गदर्शन केले. लिना फलके यांनी सुध्दा शिक्षणपर मार्गदर्शन केले. आपल्या जिल्हयातील विद्यार्थी हा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात व भारताबाहेरील उच्च पदावर कार्यरत आहे. आपल्या परिश्रमातुन व प्रबल इच्छेने कित्येक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर अश्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत, यांनी जिल्ह्याचे नावलौकीक केले आहे. अशाच गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटत आहे असे वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी आपले मत व्यक्त केले. मार्गदर्शनानंतर पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

वर्ग १० वीच्या परिक्षेत शहरात प्रथम आल्याबद्दल कु. रिध्दी किशोर हत्तीमारे यांना कै. भाऊसाहेब दलाल, कै. दशरथराव जागेश्वरराव गिन्हे, कै. शालिनीताई वसंतराव मादुरकर, सौ. मिना शालिकराम कुलरकर रौप्य पदक, श्री. राजनजी भवरे जिल्हाधिकारी यांचे कडुन संगणक, पुस्तक भेट व वाचनालयाकडुन स्मृती भेट देवून सत्कार करण्यात आला. कु. अंजली भालचंद्र सेलोकर यांना कै. भागीरथा भास्कर शंभरकर स्मृति पुरस्कार व सार्वजनिक वाचनालयातर्फे स्मृति चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कु. अक्षरा चंद्रमणी चहांदे यांचा मागासवर्गीयातुन भंडारा शहरात प्रथम आल्याबद्दल कै. बायाबाई पांडुरंगजी बागडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रौप्य पदक देवून सत्कार करण्यात आला. वर्ग १२ च्या परिक्षेत कु. शिखा मुरलीधर जसवानी यांना भंडारा शहरातुन प्रथम आल्याबद्दल स्व. भाऊसाहेब दलाल स्मृति प्रित्यर्थ पदक, कै. भागिरथा भास्कर शंभरकर स्मृति पारितोषीक, श्रीमती शालिनीताई वसंतराव माटुरकर स्मृति रौप्य पदक, सौ. मिना शालिकराम कुलरकर यांच्याकडून रौप्य पदक, भंडारा शहरात इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्व. निलकंठराव कठाळे रौप्य पदक, श्री. राजन भवरे यांच्याकडून पुस्तक व वाचनालयाकडून स्मृति चिन्ह देवून सत्कार करण्यात आले.

कु. सलिना सलिम खान यांना भंडारा शहरातुन व्दितीय आल्याबद्दल कै. भागिरथा भास्कर शंभरकर पारितोषिक देवून सत्कार व वाचनालयाकडून स्मृति चिन्ह देवून सत्कार, कु. अलिशा निलेश गडपायले यांना भंडारा शहरातुन मागासवर्गीयातुन प्रथम आल्याबद्दल कै. बायाबाई पांडुरंग बागडे यांचे स्मृति प्रित्यर्थ रौप्य पदक व वाचनालय कडून स्मृति चिन्ह देवून सत्कार, कु.भार्गवी सुरेश खोकले यांना भंडारा शहरातून गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविल्याबद्दल स्व. संजय भद्रसेन वाढई यांचे स्मृति प्रित्यर्थ स्मृति चिन्ह देवून सत्कार, कु. अमिशा प्रमोद बेदपुरीया यांना भंडारा शहरात जीवशास्त्र विषयात कै. मनिष चंदेल रौप्य पदक देवून सत्कार करण्यात आला. सीबीएसई पॅटर्न च्या वर्ग १० च्या परिक्षेत कु. मृणाल धनंजय गभणे यांना भंडारा शहरातून गणित विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्व. प्रविणा राजेश हर्षे यांच्या स्मृति प्रित्यर्थ स्मृति चिन्ह देवून सत्कार, तसेच डॉ. मृणाल मेश्राम यांनी एम. डीएस, पीएचडी मध्ये सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल सार्वजनिक वाचनालयाकडून स्मृति चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जयंत आठवले प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. प्रदिप गादेवार हयांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाला सर्वश्री गुरूप्रसाद पाखमोडे, हर्षल मेश्राम, डॉ. उल्हास फडके, डॉ. प्रकाश मालगावे, मदन बागडे, धनंजय ढगे, शेखर (बाळा) गभने, तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे कर्मचारी घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, दिनेश हरडे, सुधिर खोब्रागडे, युवराज साठवणे, मारोती वाघमारे यांची प्रयत्न केले. तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *