भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा /तुमसर : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या खापा जिल्हा परिषद सर्कल मध्ये येत असलेल्या तामसवाडी, (तुडका) येथे मागील दोन वर्षापासून एकच शिक्षक वर्ग एक ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सांभाळत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या खूप मोठे नुकसान होत असल्याचे सुद्धा आढळून आले आहे. तेव्हा या २०२४-२५ वर्षात विद्यार्थ्यांना नवीन शिक्षक मिळणार का?, वर्ग एक ते चौथीपर्यंत एकच शिक्षक सांभाळतो हे जिल्हा परिषद शिक्षण विभागासाठी खूप मोठी लाजिरवाणी बाब समोर आली आहे.
एकच शिक्षक असल्यामुळे त्यांना मीटिंग आणि शालेय कामे इतरही कामे असल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठा शैक्षणिक नुकसान होत आहे. आमच्या मुलांचे भवितव्य खराब होण्याची शक्यता असल्यामुळे ताबडतोब आमच्या शाळेला शिक्षक देण्याची मागणी निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तुमसरयांना केली आहे, असे पालकांनी सांगितले. एकूण पटसंख्या २६ विद्यार्थी एकच शिक्षिका सध्याच्या स्थितीत मागील वर्षापासून सांभाळत आहेत ही एक खेदाची बाब आहे. निवेदन देताना पोलीस पाटील पोर्णिमा गिरीपुंजे, विजय चोपकर, रंजना ठाकरे, हिना कुकडे, आसिया ठाकरे, दीक्षा तितीमारे, नलिनी ढबाले, मोनिका गाढवे, शांताबाई राऊत, सीमा गिरीपुंजे, सानंदा चोपकर, शुल्का चोपकर, कमलेश हटवार, कल्पेश ठाकरे, मनोज ठाकरे, उमेश तितीमारे, प्रिया गिरीपुंजे, शाळा कमिटीचे सदस्य गण व उपस्थित होते,