भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : भारतीय सैन्य दलात कार्यरत तालुक्यातील ग्राम बाम्पेवाडा निवासी नितीन वामनराव खेडीकर वय ३७ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. शहीद नितीन गोवाहाटी येथील सैन्य मुख्यालयात कार्यरत होता. निधनाची बातमी कळताच बांम्पेवाडा परीसरात शोककळा पसरली. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील ग्राम बाम्पेवाडा येथील शेतकरी कुटुंबातील शेतकरी वामन खेडीकर यांचे तीन्ही मुलं भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. मोठा मुलगा नितीन हा वर्ष २००५ ला भारतीय सेनेच्या रँक एच. ए. व्ही. सेवेत दाखल झाला होता. तो गुवाहाटी येथील सैन्य मुख्यालयात कार्यरत होता.अन्य दोघे भाऊ अश्विनकुमार व स्वप्नील सैन्य सेवेत कार्यरत आहेत. शहीद नितीन च्या अचानक मृत्यू पश्चात पत्नी रूपलता,मुलगा परिक्षीत ८ वर्ष, मुलगी अदिती ५ वर्ष,आई वडील भाऊ व शोकाकुल कुंटुबिय आहेत. गुवाहाटी वरुन सकाळी ७ वाजता शहीद नितीन चे पार्थिव शरीर आणले जाणार असून दुपारनंतर गृहग्राम बामपेवाडा येथे अंत्यविधी होणार आहे.