राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वेळेआधीच दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या उत्तरार्धात राज्यातून दडी मारली होती, पण आता पुन्हा हा पाऊस परतला आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज शुक्रवारी राज्यातील काही भागात आणि विशेषकरुन विदर्भ आणि कोकणात मूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मोसमी पावसासाठी पुरक असा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे आहे, त्यामुळे राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. प्रामुख्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने उसंत घेतली होती. तर विदर्भात देखील तुरळक सरी वगळता फारसा पाऊस झाला नाही. केवळ रविवारी उपराधानीत मुसळधार पाऊस झाला. मात्र, आज शुक्रवारी हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि विदर्भात मुसळधार तर उत्तर व मध्यमहाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाºयासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

विदर्भासह कोकण आणि घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर आणि कोकणात सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी येथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विदर्भात मूसळधार पावसाचे वातावरण असले तरी पावसाच्या हलक्या सरी वगळता फारसा पाऊस पडलाच नाही. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे राज्य व्यापलेला मोसमी पाऊस कधी सक्रीय होणार आणि राज्यात दमदार पाऊस कधी दाखल होणार याचीच प्रतिक्षा होती. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाने ही प्रतिक्षा संपल्यात जमा आहे. मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होऊन मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला असून ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *