भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या संदर्भात माहिती व जनजागृती करण्याकरिता तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांचा प्रचार दौरा कार्यक्रम दि.६ जुलै २०२४ ला परमात्मा एक सभागृह आंधळगाव येथे सभापती रितेश वासनिक, तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, जि.प. सर्कल प्रमुख प्रदीप बुराडे, पं.स.सर्कल प्रमुख संजय मते, सरपंच ईश्वर माटे, उपसरपंच लोकेश सार्वे, रामरतन खोकले, बुराडे गुरुजी, मंगेश डहाके, धामा समरीत, श्रीधर कायते, उमेश उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जनसामान्यांकरिता विविध कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आली. त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील सर्व महिलांना दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत तीन गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहेत. मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना मागील त्याला सौर पंप, आणि मौदा येथे परमपूज्य परमात्मा एक भवनाच्या सौंद्रीकारणासाठी ७७ करोड निधी,ह्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य पर्यंत पोहोचवा आणि सामान्य जनतेला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.