महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र नाट्यस्पर्धेत खापरखेडा वीज केंद्राचे ‘पूर्णविराम’ प्रथम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नाट्यस्पर्धेत नवनवीन लोक आले पाहिजेत आणि प्रतिभासंपन्न रंगकर्मीना मोठा मंच उपलब्ध व्हावा यासाठी महानिर्मिती प्रयत्नरत आहे. नाट्यस्पर्धेतून सांघिक भावना वृद्धिंगत करून त्याचा महानिर्मितीच्या शाश्वत विकासासाठी उपयोग व्हावा असे मत महानिर्मितीचे संचालक(संचलन) संजय मारुडकर यांनी व्यक्त केले. ते महानिर्मितीच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात सायंटीफिक सभागृहात अध्यक्षस्थानाहून बोलत होते. समारोपीय समारंभात विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी संजय पेंडसे परीक्षक संजय हल्दीकर, बाळकृष्ण तिडके, संगीता टिपले तर महानिर्मितीचे कार्यकारी संचालक पंकज सपाटे, विवेक रोकडे, मुख्य अभियंते किशोर राऊत, विजय राठोड, गिरीश कुमरवार, विलास मोटघरे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम प्रामुख्याने रंगमंचावर उपस्थित होते. प्रत्येक वीज केंद्राने निवडलेल्या नाटकांची नांवे आणि त्या-त्या वीज केंद्राची संस्कृती तथा कार्यपद्धतीची उत्कृष्ट सांगड घालत संजय मारुडकर यांनी उपस्थितांना आश्चर्यचकित केले. महानिर्मिती अधिकारीकर्मचाºयांनी विक्रमी वीज उत्पादन केल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

ज्येष्ठ रंगकर्मी संजय पेंडसे यांनी दोन महत्वपूर्ण सूचना केल्या त्यात महानिर्मितीच्या प्रतिभासंपन्न रंगकमीर्ना प्रयोगाच्या आदल्या दिवशी नाट्यगृहात रंगीत तालीम व्यवस्था करून दिल्यास तांत्रिक चुका कमी होण्यास मोठा हातभार लागेल आणि जे कर्मचारी प्रथमच रंगमंचावर आपली कला सादर करणार आहेत त्यांना विशेष गुण अथवा सन्मान देण्यात यावा जेणेकरून नाटकात सहभाग वाढेल. कला आनंद देते, आपली कला लोकांपर्यंत पोहोचविणे सोपे नाही त्याकरिता तपश्चर्या करावी लागते. भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांनी ध्येय गाठण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे त्यांनी उदाहरण दिले. जी गोष्ट शाळेत शिकवली जात नाही ती नाटकात शिकता येते. त्यांनी महानिर्मिती नाटकांच्या नावांची अभिनव स्वरूपात गुंफण करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पंकज सपाटे म्हणाले प्रत्येक वीज केंद्राने आपल्या वर्धापन दिनाला नाट्य प्रयोग सादर केल्यास वीज केंद्रातील अधिकारी-कर्मचारी आणि कुटुंबियांना आपली नाट्यकला दाखवता येईल. तसेच यु-ट्यूब सारख्या समाज माध्यमांवर नाट्यस्पर्धा लाइव दाखविल्यास महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचारी आणि कुटुंबियांना ही नाटके सहज पाहता येतील. विवेक रोकडे यांनी आकस्मिक निधन पावलेल्या अभिजित कुळकर्णी आणि नाटकाची तुलना करताना आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि, आयुष्य हे एक नाटक आहे, आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या भूमिका करत असतो.

त्यांनी आनंद चित्रपटातील सुप्रसिद्ध डायलॉग ‘बाबूमोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ मे है, उसे ना तो आप बदल सकते है ना मै… हम तो सब इस रंगमंच कि कठपुतलीया है जिनकी दोर उपरवाले कि उंगलीयो में बंधी है.’ परीक्षक संजय हळदीकर म्हणाले की, महानिर्मितीचे रंगकर्मी पंढरपूर वारकºयांप्रमाणे भक्तिभावाने नाटक करतात, नाटकाची जाण आहे. जाणीवा प्रगल्भित करणारी नाट्यस्पर्धा असून महानिर्मितीमध्ये स्त्री दिग्दर्शिका आहे ही अभिमानाची बाब आहे. या नाटकांना सौंदर्य, भावनिक, बौद्धिक मुल्ये असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. ही नाट्यस्पर्धा नसून कौटुंबिक सोहळा आहे, एकमेकांना भेटण्याची हितगुज करण्याची अभिव्यक्ती सादर करण्याची संधी मिळाली असल्याचे रंगकर्मी महेंद्र राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी, सेवानिवृत्त रंगकर्मींचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यात अनिल शिंदे (उरण), प्रदीप साळे (भुसावळ), अरविंद वानखेडे (पारस), राहुल बागडे (खापरखेडा), दिवाकर देशमुख (कोराडी), मुकुंद भोकरधनकर (कोराडी) यांचा समावेश होता. विजेत्या रंगकर्मींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. रंगमंचावर पहिले पाऊल म्हणून बालकलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.

विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रारंभी प्रभारी मुख्य अभियंता अभिजित कुळकर्णी यांच्या आकस्मिक निधनाबाबत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महानिर्मिती जनसंपर्क विभागाकडून ‘महानिर्मिती यशोगाथा’ ही चित्रफित दाखविण्यात आली. प्रास्ताविक तथा अहवाल वाचन उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम यांनी केले तर सूत्र संचलन रवी पवार, जयंत भातकुलकर वआभार प्रदर्शन मयूर मेंढेकर यांनी केले. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. महानिर्मितीच्या ह्या नाट्यस्पर्धेत सुमारे ३०० रंगकर्मींनी सहभाग नोंदविला. एकूण ८ नाट्यप्रयोग प्रस्तुत झाले त्यात कोराडी (गावभाग), परळी (संश यात्मा विनश्यती), भुसावळ (एक्सपायरी डेट), नाशिक (दोन स्पेशल), उरण(भांडा सौख्यभरे), खापरखेडा(पूर्णविराम), चंद्रपूर(यक्षप्रश्न) व मुंबई (तिचे संदर्भ नसलेली गोष्ट) इत्यादींचा समावेश होता. समारंभाला महानिर्मितीचे उपमुख्य अभियंते प्रवीण रोकडे, शैलेन्द्र कासुलकर, अधीक्षक अभियंते सचिन भागेवार, नितीन रोकडे, गीतांजली पारखी, किरण नानवटकर, सारिका सोनटक्के, सचिन देगवेकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, समन्वयक प्रवीण बुटे, विविध नाट्य संघांचे संघ व्यवस्थापक, कल्याण अधिकारी, सहाय्यक कल्याण अधिकारी, नाट्यस्पर्धा आयोजन समिती, संघटना प्रतिनिधी, कलावंत/ रंगकर्मी तसेच कोराडी-खापरखेडा- नागपुरातील महानिर्मितीचे अधिकारी, कर्मचारी, कुटुंबीय, सेवानिवृत्त

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *