भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाहिजे त्या प्रमाणात यश आले नाही. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची रणनीती तयार केली जात आहे. यासाठी जागा वाटपावर चर्चा सुरु झालीअसल्याची माहिती आहे. त्याचवेळी पूर्व विदर्भात पूर्व श्रमीचे शिवसैनिक तथा माजी आमदार चरण वाघमारे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असून हाती मशाल घेण्याची शक्यता आहे.
तुमसर विधानसभा उमेदवारी बाबत विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी उमेदवारी संदर्भात बोलताना सूतोवाच केला की, जर महाविकास आघाडीतून मला तुमसर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळत असेल तर मी सर्वात प्रथम प्राधान्य शिवसेनेच्या मशाल या चिन्हांला देणार असे म्हटले तसेच माज्या विकास फाउंडेशनच्या चिन्हांत मशाल चिन्ह असून मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या १९९३ चा शिवसैनिक आहे. त्यामुळे तुमसर विधानसभा मतदारसंघाचे माजी भाजप आमदार चरण वाघमारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संपर्कात असून जर महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाल्यास निश्चितच मशालीवर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.