भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : शहरातील सेलोटी रोड परिसरातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ते मानेगाव बेळा पर्यंत मार्ग जोडणारा पांदन रस्त्याचे काम मागील काही दिवसापूर्वी करण्यात आले होते. या रस्त्यावर आदर्श नगर कडून सेलोटीकडे जाणाºया नाल्यावर बंधाºयाचे बांधकाम झाले होते. बंधाराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मागील तीन वषार्पासून बंधारा फुटला असून लाखनी मानेगाव बेळा येथे जाणारा मार्ग शेतकºयांसाठी आणि शेतीपूरक वाहनांसाठी बंद झालेला आहे.
स्थानिक शेतकºयांनी अनेकदा तहसील कार्यालय लाखनीयेथे अर्ज विनंती करून काही फायदा झालेला नाही यामुळे सदर शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे उन्हाळ्यामध्येच निवेदन सादर केलेहोते. परंतु पावसाळा लागण्यापूर्वी शेतकºयांना ही व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली, परंतु पावसाळ्या लागण्यापूर्वी बंधाºयाचे काम पूर्ण व्हावे ही शेतकºयांची अपेक्षा होती. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे भर पावसाळ्यामध्ये शेतकºयांना कमालीचा त्रास सहन करावा लागणार आहे, यावर शेतकरी नाराज असून मुख्यमंत्री यांनाही त्यांनी निवेदन लिहिलेले आहे. त्यामुळे आता तरी जिल्हाधिकारी साहेब लक्ष द्याल का ही ओरड शेतकºयांकडून होत आहे. प्रशासनाने एकदा तरी लक्ष देत, चौकशी करून परिस्थितीचा आढावा घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.