भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : रात्रीच्या सुमारास लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्य बजावून मालकी दुचाकीने स्वघरी जात असलेल्या एका पोलीस अंमलदाराची रस्त्यावरील ट्रॅक्टरच्या चिखलावरून दुचाकी केल्याने दुचाकी स्लीप होऊन पोलीस अंमलदार जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असतात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ६ जुलै रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील किशोर कपडा बाजार समोरील रस्त्यावर घडली. अनिल नामदेव राठोड (३५) असे घटनेतील मृतक पोलीस अंमलदाराचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, घटनेतील मृतक अनिल नामदेव राठोड हे लाखांदूर पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार म्हणून मागील काही वर्षापासून कार्यरत आहेत. ६ जुलै रोजी ते लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्य बजावीत होते.
दरम्यान, कर्तव्य बजावून रात्रीच्या सुमारास मालकी दुचाकीने ते स्वघरी जात असतांना राष्ट्रीय महामार्गावर शेतातील रोवणीचे चिखल असल्याने त्यावरून अंमलदार अनिलची दुचाकी गेली व स्लीप झाली. या अपघातात अनिल दुचाकीसह सिमेंट रस्त्यावर पडला व जखमी झाला. ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताचत्यांनी जखमी अनिलचे हेल्मेट काढून पाहणी केली यावेळी अनिलच्या डोक्याला मार लागून रक्तस्त्राव होत होता. यावेळी त्यांनी लगेच अंमलदार अनिल राठोड यांना उपचारासाठी स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाºयांनी प्रथमोपचार करून मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होतात पोलिसांनी तात्काळघटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी केली आहे.