भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज संपुर्ण जगात झाडांची सावली सर्व लोकांना पाहीजे असते. मात्र, झाडे लावायला कोणीही पुढाकार घेत नाही. भंडारा शहरात कित्येक ठिकाणी वृक्षरोपण करता येवू शकतो पण, पुढाकार घ्यायला कोणीही तयार नाही. हि सर्व बाब भंडारा शहरातील काही उत्साही सामाजिक कार्यकत्यांच्या लक्षात आली व त्यांनी वृक्षारोपण मोहिम राबवायला सुरवात केली. वाईल्ड चॅलेंजर आॅर्गनायझेशन चे राज बघेले व युवा शक्ती संघटनेचे गोवर्धन निनावे यांच्या पुढाकाराने मोहिमेला श्री गणेश हायस्कुल राजीव गांधी चौक, भंडारा येथून सुरवात करण्यात आली आहे. भंडारा शहरात १० हजार वृक्ष लावण्याच्या मोहिमेला दि.८ जुलै २०२४ पासुन सुरवात करण्यात आलेली आहे. १० हजार वृक्ष लावण्याच्या मोहिमेला भंडारा शहरातील श्रीगणेश शाळेतुन सुरूवात करण्यात आली. सदर वृक्षारोपण कार्यक्रम पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
याप्रसंगी श्रीगणेश शाळेत ३० रोपटे लावून मोहिमेला प्रारंभ करण्यात आले. असेच टप्याटप्याने संपुर्ण भंडारा शहरात वृक्षरोपण करण्यात येतील, असे वाईल्ड चॅलेंजर आॅर्गनायझेशन चे राज बघेले व युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन निनावे यांनी सांगितले. भंडारा शहरात १० हजार वृक्ष लावण्याच्या मोहिमेला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता भंडारा शहरातील वाईल्ड चॅलेंजर आॅर्गनायझेशनचे राज बघेले, युवा शक्ती संघटनेचे गोवर्धन निनावे, दर्पण नागदेवे, दिलीप निखाडे, शुभम साकुरे, एकांश चव्हाण, गायत्री नारवरिया, रविना नारवरिया व श्रीगणेश शाळेचे मुख्याध्यापक महाकाळकर व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थि प्रामुख्याने उपस्थित होते.