भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक विहिरींमध्ये उंदीर, घुस, मेंडक, सांप, मांजर, किळे इत्यादी पाण्यात जाऊन पडतात त्यामुळे पाणी अत्यंत घाण होत असून तो नागरिकांना पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य राहत नसून त्या पाण्याची घाण वास येतो. त्यामुळे शहरातील नागरिकांना त्यांच्या योग्य आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक विहिरीमधील पाणी वापरता यावा यासाठी नगरपरिषदेकडून प्रत्येक महिन्यातून दोन वेळा ब्लिचिंग पावडर घालण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना सदर शुद्ध पाणी मिळण्यास सोईचे होईल अशी मागणी गुरुवारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्याकडे शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांनी निवेदनाद्वारे केली होती.
त्याअनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने दखल घेऊन आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना ताबडतोब सूचना दिल्या त्यानुसार सोमवारी शहरातील सार्वजनिक विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर घालण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शाखा प्रमुख रोशन ढोके, स्वच्छता निरीक्षक कृष्णकांत भवसागर, सफाई कामगार कुणाल शेंदरे, विक्की रगडे, आयुष बघेले, तुषार रगडे उपस्थित होते.