आगामी विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी कॉंग्रेस पक्ष महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार – राजेंद्र जैन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारीत कार्यकारीणीची बैठक आज दि. ८ जुलै रोजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुध्दे, माजी आमदार राजेंद्र जैन व प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. याप्रसंगी धनंजय दलाल यांनी मार्गदर्शन करतांना, नुकताच अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विविध योजना राबवून समाजातील महिलांकरीता लाडकी बहीण योजना , प्रशिक्षणार्थी युवकांना कार्यप्रशिक्षणात दरमहा विद्यावेतन देण्यात येईल असे जाहीर केले, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वषार्पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, फार्मसी मेडीकल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपुर्ण प्रतिपुर्ती जाहीर केली. वर्षाला तीन सिलिंडर मोफत, राज्यातील ४४ लाख शेतकयांना मोफत वीजपुरवठा अशा अनेक योजनांची माहिती यांनी यावेळी दिली. जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे यांनी पक्ष संघटना व बुथ कमिट्या मजबुत करण्यासाठी जिल्हा परीषद सर्कल निहाय बैठका घेण्याच्या सुचना पदाधिकाºयांना दिल्या.

माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यकत्यार्ना मार्गदर्शन करतांनी प्रफुल पटेल यांचे हात बळकट करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे अशा प्रकारच्या सुचना त्यावेळी केल्या. याप्रसंगी श्रीमती मदनकर, गटनेता अविनाश ब्राम्हणकर, यशवंत सोनकुसरे, त्रिवेणी पोहरकर, रत्नमाला चेटुले, संजना वरकडे, रितेश वासनिक, लोमेश वैद्य, विजय सावरबांधे, बालु चुन्ने, सदाशिव ढेंगे, धनेंद्र तुरकर, नागेश वाघाये, धनु व्यास, अंगराज समरित, बाबुराव बागडे, विनयमोहन पशिने, शेखर (बाळा) गभने, आशिष दलाल, किर्ती गणविर, हेमंत महाकाळकर, शरद मेश्राम व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *