भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहरातील सिंगाडा तलाव तीन दिवसात आलेल्या जबरदस्त पावसाने पूर्णपणे भरून गेल्याने त्याची पाळ फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने नगरपरिषदेतर्फे या तलावा जवळून जाणारा मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला आहे. तिरोडा शहरासह तालुक्यात मागील तीन दिवसात जबरदस्त पाऊस झाल्याने तिरोडा शहरातील शिंगाडा तलाव पूर्णत: भरून या तलावाचेपाळी वरून जात असलेला राजेंद्र प्रसाद शाळा ते गजानन महाराज मंदिरासमोरील रस्त्याची पाळ खचल्याचे दिसल्यावरून ७ तारखेचे रात्री ९ वाजता दरम्यान लक्षात आल्यावरुन नगरपरिषद तिरोडा तर्फे ७ तारखेचे रात्री ९ वाजताचे दरम्यान हा मार्ग दोन्ही बाजूने बासाचे कठडे लावून बंद करण्यात आला असून आणखी पाऊस आल्यास कुठल्याही क्षणी ही पाळ फुटून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन मार्ग बंद करण्यातआल्याने कुठल्याही दूध घटनेची शक्यता नसली तरी शेतातील धान्याचे परे वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच या मार्गाने तिरोडा रेल्वे स्टेशन कडे येजा करणारे जाणारे प्रवाशांची अडचण निर्माण झाली आहे.