भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून रब्बी हंगामातील झालेल्या धान खरेदी पैकी उर्वरित ५५ कोटी रुपये भंडारा जिल्हा व ७७ कोटी गोंदिया जिल्ह्याची रक्कम येत्या दोन दिवसात जिल्हा मार्केटिंग कार्यालयाला प्राप्त होऊन लवकरच शेतकºयांच्या खात्यात वळती केली जाईल, असे माजी खासदार सुनील मेंढे यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात सुनील मेंढे यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या वरिष्ठ अधिकाºयांनी संपर्क करून माहिती घेतली. भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील उत्पादित धानाची मे आणि जून या दोन महिन्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून ३ लाख ११ हजार ९७६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. मे महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या या धानापोटी देय असलेली १२ कोटी ९९ लाख ८४ हजार ३३३रूपयांची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आली. मात्र जून महिन्यातील खरेदीपोटी शेतकºयांना अदा करावयाची ५५ कोटी १० लाख ६० हजार २५६ ही रक्कम प्राप्त झाली नव्हती. तसेच गोंदिया जिल्ह्यातील एकूण खरेदी ४ लाख ७२ हजार ७०१ क्विंटल ची देय रक्कम १०३ कोटी १९ लाख पैकी २६ कोटी ९ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. उर्वरित ७७ कोटी रुपये येत्या दोन दिवसात जिल्हा मार्केटिंग कार्यालयाला प्राप्त होऊन लवकरच शेतकºयांच्या खात्यात वळती होणार आहे.
या अनुषंगाने माजी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्र शासनाच्या पुरवठा विभागाचे अधिकारी आणि मार्केटिंग फे- डरेशनच्या वरिष्ठ अधिकाºयाांशी दूरध्वनी द्वारे संवाद साधला. शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकºयांनी विक्री केलेल्या धानाचे चुकारे विना विलंब दिले जावेत असा आग्रह त्यांनी धरला. दरम्यान त्यांच्या या मागणीला सकारात्मक घेतल्याचे समजते. केंद्र शासनाकडून ही रक्कम आता प्रधान कार्यालयाला पाठविण्यात आली असून लवकरच ती जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांकडे वळती केली जाणार असल्याची माजी खा. सुनील मेंढे यांनी दिली. जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांकडे येताच शेतकºयांच्या खात्यात ती वळती केली जाणार असल्याने शेतकºयांनी चुकाºयांच्या संदर्भात काळजी करू नये, लवकरच एक ते दोन दिवसात ही रक्कम खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकºयांच्या व्यथा लक्षात घेत माजी खासदार सुनील मेंढे यांनी केलेला हा पाठपुरावा नक्कीच शेतकºयांसाठी दिलासा देणारा ठरेल यात शंका नाही..