माझी लाडकी बहिण योजनेतुन शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातुन शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले असा घणाघातमाजी आमदार यांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेतुन केला. वाघमारे यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विविध अटी घालून १५०० रुपये प्रति महिना मानधन देण्याची केलेली घोषणा तसेच मागील वर्षी एसटी मधे महिलांना प्रवासात सूट ह्या योजना लाभदायक असल्या तरी त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.शेतकºयांना शेतात पेरणी पासून कापणी पर्यंत आणि पशुपालनासाठी मजूर मिळेनासे झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेऐवजी शेतकरी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना सुरु केली असती आणि या योजनेसाठी शेतात कामाला जाणाºया शेतकरी किंवा शेतमजूर महिलांना आणि पुरुषांना प्रोत्साहन अनुदान म्हणून प्रति महिना १५०० रुपये दिले असते तर शेतीला आणि शेतकºयाला सुद्धा चांगले दिवस आले असते.

पाळीव जनावरे पाळतानी शेतकºयांना ज्या अडचणी येतात त्या मजुरा अभावी तयार झाल्या नसत्या तसेच जनावरे कत्तलखाण्यात विकण्याची वेळ आली नसती. दूध उत्पादनात वाढ, पशू घटकांची घटलेली संख्या वाढली असती, शेती उत्पादनात वाढ झाली असती असेही ते म्हणाले. महाराष्ट्र शासनाने ओबीसी समुदायासाठी मोदी आवास योजना सुरु केली असून लाखो लोकांना घरकुल मंजूर करण्यात आले. घर मंजूर झाले म्हणून अनेकांनी आपले जुने घर पाडुन योजनेचा पहिला हफ्ता मिळाला म्हणून बांधकाम सुरु केले.मात्र अनेकांना दुसरा हफ्ताच मिळाला नसुन काही लाभार्थी तिसºया हफ्त्याची वाट आहे. अंतिम हफ्त्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.एवढेच काय तर शहरातील लाभार्थ्यांना दोन वषार्पासून घरकुलाचे पैसे मिळाले नाही. या योजनेसाठी शासनाकडे अनुदान नाही तर लाडकी बहिणेचा काय होणार त्यासाठी पैसे कुठून आणणार असा सवालही चरण वाघमारे यांनी यावेळी उपस्थित केला.

महाराष्ट्र शासनाने दुध उत्पादकांना लिटरमागे ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी या योजनेत ज्यांचे दुध संकलन केंद्राचे आॅनलाईन रजिस्ट्रेशन आहेजो केंद्र शासनाला दूध उत्पादनाचा रेकार्ड देतात अशांनाच ५ रुपये प्रतिलिटर मागे अनुदान मिळणार असुन हा दुध उत्पादक शेतकºयांवर अन्याय आहे. करीता दुध संकलन करणाºयांना सरसकट ५ रूपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी वाघमारे यांनी यावेळी केली. केंद्र आणि राज्य शासन पीएमकिसान योजना तसेच शेतकरी सन्मान निधी अंतर्गत प्रति शेतकरी ६००० व ६००० असे एकूण १२००० रुपये प्रति शेतकºयांना देत असतानी खते,बियाणे,किटकनाशक औषधे यांच्या किंमती वाढवुन शेतकरी सन्मान निधीच्या बदल्यात शेतकºयांची सर्रास लुट करीत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी याप्रसंगी केला. सरकारने वीज बिलात भरमसाठ वाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे.एकीकडे वीज बिलाचे प्रति युनिटचे बीलामध्ये वाढ करून त्यासह इतर आकारण्यात येणाºया करांमध्ये सुध्दा वाढ झालेली आहे.

सत्तेच्या जोरावर वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून सर्वसाधारण जनतेला लुटण्याचे काम सरकारकडुन सुरु असून हे थांबविण्यासाठी आगामी काळात लोक चळवळ उभी होणे गरजेचे असल्याचे मत विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला विकास फाउंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष माजी आ. चरण वाघमारे,भंडारा जि.प. भंडारा चे कृषि व पशु संवर्धन सभापती राजेश सेलोकर, तुमसर पंचायत समितीचे सभापती नंदू रहांगडाले, उपसभापती हिरालाल नागपुरे, मोहाडी पंचायत समितीचे उपसभापती बबलू मलेवार, डॉ. प्रकाश महालगावे, धनंजय मोहोकर, अरविंद भालाधरे, चंद्रशेखर भिवगडे, अरुण भेदे, नेहालचंद पाटील, विश्वनाथ कुकडे, सरपंच महेश कळंबे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *